Goa Agriculture: भातशेतीसाठी ‘राशोल’मधील युवकांचा पुढाकार

पारंपरिक पद्धतीचा वापर : एकतेच्या भावनेतून काम; भाजीपाल्यासह फळांचीही लागवड
Agriculture
AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Agriculture पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीतील कामांना वेग आला आहे.  राशोल  सेमिनारीतील युवकांनीही  राय येथील शेतजमिनीत पारंपरिक पद्धतीने  भातशेती करण्यास सुरवात केली.  राशोल सेमिनारीने  राशोलसह शिरोडा, आरोसी, बोर्डा येथील युवकांच्या मदतीने आपल्या मालकीच्या शेतजमिनीत शेतीचे काम हातात घेतले आहे. 

याबाबत बोलताना राशोल सेमीनरीचे प्रशासक फादर जोलिसन फर्नांडिस म्हणाले, मी स्वत: या शेतजमिनीची देखभाल करीत आहे. देवाने आम्हाला हिरवीगार शेतजमीन दिली आहे. त्याचा उपयोग लागवडीसाठीच व्हायला पाहिजे या मताचा आपण आहे. 

Agriculture
Pernem Road Issues: तांबोसे- मोपा रस्ता बनलाय मृत्यूमार्ग, गलथान कारभारामुळे खड्ड्यांचे ग्रहण काही सुटेना

जे युवक या शेतीकामासाठी जमले आहेत त्या सर्वांमध्ये एकतेची भावना आहे. त्यांनी सांगितले की, सध्या शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आम्ही मात्र आमच्या पारंपरिक पद्धतीचाच काही निकष सांभाळून अवलंब करतो. 

शेतामध्ये भाताची लागवड पूर्ण झाल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान आम्ही या शेतामध्ये भाजीपाला, वेगवेगळ्या प्रकारची फळे खासकरून अननस व कलिंगडांची जास्त लागवड करतो.

राशोल सेमिनरी केवळ अभ्यास व प्रार्थना करण्यासाठी नसून शेतजमिनीची देखभाल व लागवडीस तेवढेच प्राधान्य देते, असे  क्रिस्पियानो फर्नांडिस याने सांगितले. फर्नांडिस हा सेमिनारीशी संबंधित आहे.

Agriculture
Goa Police: राजस्थान येथील कुख्यात गुन्हेगाराला गोव्यात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

भातशेतीवर भर

यंदा राज्य सरकारच्या कृषी खात्याने भातशेतीवर भर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना 400 टन भात बियाण्याचे वितरण केले आहे. यामध्ये  गोवा धान 1,  गोवा  धान 3, जया, ज्योती व करजत प्रकारांचा समावेश आहे.

त्यामुळे यंदा 80 ते 100 हेक्टर ज्यादा शेतजमीन लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. जर पावसाळा ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबला तर यंदा चांगले पीक येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com