Goa Medical College: गोमेकॉत आता डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार पोलिस, व्हिडिओ व फोटोग्राफीवर बंदी

GMC Doctor Suspension: मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावल्यानंतर मंगळवारी (१० जून) प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या सातही मागण्या मान्य केल्या आहेत.
Goa Medical College | GMC Doctor Suspension
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) डॉक्टरांचा संप अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला. डॉक्टरांच्या सातही मागण्या मान्य करून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मंगळवारी (१० जून) दुपारी मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉला भेट दिली आणि डीन शिवानंद बांदेकर, वैद्यकीय अधीक्षक तसेच 'गार्ड'च्या सदस्यांसह बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी सोमवारी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते आणि आज प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या सातही मागण्या मान्य केल्या आहेत.

व्हिडिओ व फोटोग्राफीवर बंदी, सुरक्षेसाठी पोलिस आऊट-पोस्ट व ५० पोलिसांची तैनाती, तसेच अशा प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समिती स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

Goa Medical College | GMC Doctor Suspension
Goa Crime News: अंबरग्रीस तस्करी प्रकरणी मुंबईतील मच्छीमाराला अटक तर फोंड्यात घरमालकाला लुटणारा भाडेकरू जेरबंद

दरम्यान, डॉक्टरांनी आंदोलन न करण्याचे आश्वासन दिल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांनीही 'गार्ड'चे आभार मानत सांगितले की, सर्वांनी संयम राखून परिस्थिती हाताळली. आता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वजण एकत्र काम करतील.

डॉक्टरांच्या 'या' प्रमुख मागण्या मान्य

- व्हिडिओ-फोटोग्राफीवर बंदी घालणार

- सुरक्षेसाठी पोलिस उपनिरीक्षक, ५० पोलिस तैनात करणार

- असे प्रकार टाळण्यासाठी डॉक्टरांची समिती स्थापन करणार

दररोज हजारो रुग्ण गोमेकॉमध्ये उपचारासाठी येतात. त्यांना त्रास होऊ नये यासाठी मी सोमवारी रात्री डॉक्टरांना संप मागे घेण्याची विनंती केली होती. गरज पडल्यास मी मंगळवारी गोमेकॉला भेट देईन असे सांगितले होते. त्यानुसार लोकहिताच्या दृष्टीने आज मी डॉक्टरांशी चर्चा केली.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी आज थेट संवाद साधला आणि सकारात्मक आश्वासने दिली. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही संप मागे घेतला आहे. रुग्णांना त्रास होऊ नये हीच आमची प्राथमिकता होती, आहे आणि यापुढेही राहील

डॉ. आयुष शर्मा, अध्यक्ष (गार्ड)

Goa Medical College | GMC Doctor Suspension
Goa Crime: धक्कादायक! FDA ने सील केलेले गोदाम फोडले, जप्त केलेली केळी घेऊन मालक फरार

माफीबाबत अजूनही असमाधान

डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले असले तरी सर्वांचा सूर एकसंध नाही. मुख्यमंत्री गोमेकॉत असतानाच डीनच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका डॉक्टरने हातात फलक धरला होता, ज्यावर लिहिले होते, "मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली आहे. पण आम्हांला बनावट माफी मान्य नाही. दरम्यान, कधी तरी मंत्र्यांची माफी अधिकृत मार्गाने मिळेल अशी अपेक्षा अखेर पत्रकारांना संबोधित करताना डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com