Goa: एसीजीएल कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा दिला इशारा

कंपनीच्या (Company) व्यवस्थापनाने हा विषय तातडीने न सोडविल्यास येणाऱ्या काही दिवसात संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ACGL Trade  unions
ACGL Trade unionsDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: सुमारे 40 वर्षांपूर्वी सत्तरी तालुक्या बरोबर राज्यातील इतर भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्ये मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Former Chief Minister Pratap Singh Rane) यांच्या प्रयत्नाने होंडा व भुईपाल येथे स्थापन केलेल्या एसीजीएल (ACGL) कंपनीच्या कामगारांच्या पगार वाढीचा विषय गेली तीन वर्षे सुटत नसल्याने शेवटी येथिल एस एम डी आणि बिबिडी या दोन विभागाच्या होंडा येथिल सुंदरम सभागृहात संपन्न झालेल्या तातडीच्या कामगार संघटनेच्या वार्षिक सभेत कंपनीच्या व्यवस्थापनाने हा विषय तातडीने न सोडविल्यास येणाऱ्या काही दिवसात संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ACGL Trade  unions
Goa Murder Case: तरुणीच्या खून प्रकरणी तपास अहवालासाठी वैद्यकीय मंडळ

या कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या झेंड्याखाली संलग्नित झाल्या असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले असल्याने, येणाऱ्या काळात औद्योगिक क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या कामगार संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा आधार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे हा राजकीय पक्ष गोव्यात येण्याची सभंवना आहे.

होंडा येथिल सुंदरम सभागृहात संपन्न झालेल्या वार्षिक सभेत एसीजीएल वर्कर्स युनियन व एसीजीएल इप्लोई युनियन या दोन्ही कामगार संघटनेचा सहभाग होता, या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, कार्यकरणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश गणेश खंडारे, मनसे कामगार सेनेचे चिटणीस यशवंत हाडगे, महाराष्ट्र कामगार सेनेचे चिटणीस दिनेश चव्हाण, एसीजीएल कामगार संघटनेचे कायदेशीर सल्लागार सुभाष नाईक जॉर्ज, एस एम डी विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबलो सांवत, उपाध्यक्ष प्रशांत खानोलकर, सचिव सुभाष परब, सहसचिव सुर्याकांत गावस, खजिनदार चंद्रशेखर नाईक, सहखजिनदार मुरारी घाडी, सदस्य विनोद देसाई, तर बिबिडी विभागाचे अध्यक्ष गुणाजी परब, उपाध्यक्ष कालिदास नाईक, सचिव महेश दिवकर, सहसचिव जयसिंग देसाई, खजिनदार हरिश्चंद्र नाईक, सहखजिनदार बाबुराव साळगावकर, सदस्य बाळकृष्ण साळगावकर, संतोष गाड, अर्जुन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

ACGL Trade  unions
Goa: सत्तरीतील पूरग्रस्त कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत

यावेळी पत्रकारांना माहिती देताना मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी सांगितले की, टाटा मोटर्स सारख्या बलाढ्य कंपनीशी संलग्नित असलेल्या एसीजीएल कंपनीच्या कामगारांच्या वेतन वाढीचा मुद्दा गेल्या तीन वर्षांपासून सुटत नसल्याने आश्चर्य वाटत आहे, सदर टाटा मोटर्स कंपनी सामाजिक क्षेत्रात भरीव असे कार्य करीत असताना गोव्यातील कामगारांचा प्रश्न सुटला नाही या विषयी बोलायला सुद्धा लाज वाटते, पण हे सत्य आहे, त्यामुळे या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेनेच्या वतीने या कंपनीच्या कामगारांना पुर्ण पाठिंबा देणार असून सदर विषय तातडीने न सोडविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते येथे ठाण मांडून बसणार आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कामगारांना तीन वर्षांसाठी 3600 तर चार वर्षांसाठी 4500 रूपयांची पगारवाढ गुप्त पद्धतीने घेतलेल्या मतदानात 249 विरूद्ध 3 मतानी फेटाळली आली, यावेळी फक्त एकच मत मुख्यमंत्र्यांच्या बाजूने पडले तर दोन मते बाद ठरविण्यात आली असे राजेश उज्जैनकर यांनी सांगितले.

ACGL Trade  unions
Goa: नैसर्गिक संकटांवर मात करत शेतीतून फुलविली स्वयंरोजगाराची बाग

सदर कंपनी नफ्यात चालली असल्याने गेल्या साडेतीन वर्षां पासून कामगार संघटनेने मागितलेली 6850 रूपयांची वाढ कंपनी देत नाही त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने कामगारांच्या हक्कांसाठी मनसे कामगार सेनेचा या कामगारांना पाठिंबा राहणार आहेत, गोव्यातील इतर कंपन्यांचे कामगार सल्ला घेण्यासाठी मनसे कामगार सेनेकडे संपर्क करीत असतात, भविष्यात वेळ पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील कामगारांच्या प्रश्नांसाठी मनसे कामगार सेना उतरू शकते असे यावेळी उज्जैकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी गुणाजी परब यांनी कंपनीच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचून कंपनीने केलेल्या अन्यायामुळे संपाचे कठोर पाऊल उचलावे लागत असल्याचे सांगितले.

ACGL Trade  unions
Goa: मांगोरहिल भागातील 70 युवतींनी व 68 युवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

एसीजीएल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष बाबलो सांवत यांनी कंपनीच्या 40 वर्षांपासून सुरू असलेल्या वाटचालीची माहिती देऊन सद्य्याचे सीइओ यांनी मनमानी कारभार करून कामगारांना आज रस्त्यावर येण्याची पाळी आणली आहे, कामगारांच्या अनेक सुविधा बंद केल्या आहेत, यात जेवणाचा दर्जा सुध्दा घसरलेला आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कामगारांना चांगले सहकार्य केले मात्र कंपनी व्यवस्थापनाने सहकार्य केले नसल्याने हा विषय गंभीर बनला असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे कालिदास नाईक यांनी सांगितले की नाइलाजाने कामगारांना हा निर्णय घेण्याची पाळी कंपनीने आणली आहे, कंपनी जर नुकसानीत चालत आहे तर कंपनीच्या तर्फे सामाजिक उपक्रमा अंतर्गत पैसे खर्च केले जात आहे, यावरून कंपनीला कामगारांचे काहीच पडलेले दिसत नाही.

यावेळी प्रशांत खानोलकर यांनी थेट कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक प्रकाश नाईक यांच्यावर आरोप करताना सांगितले की ज्या वेळेपासून नाईक कंपनीत रूजू झाल्या पासून कामगारांना वाईट दिवस आले आहे, त्याच प्रमाणे कंपनीचे सी एफ ओ हे मोठे लबाड आहे, त्यामुळे कामगार संघटनेने ठेवलेल्या मागण्या मान्य न केल्यास कंपनीला गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा दिला आहे. आज पर्यंत कामगारांनी कंपनीला पुर्ण सहकार्य केले आहे, त्यामुळे आज जगभर सदर कंपनीचे नाव पोचले आहे, त्याच प्रमाणे कंपनीला कोणताच तोटा नसून सद्या कंपनीने राज्य सरकारासाठी दोन कोटींची इलेक्ट्रिक बस बांधली आहे, त्यांचे अनावरण पुढच्या महिन्यात होणार असल्याचे खानोलकर यांनी सांगितले.

ACGL Trade  unions
Goa Election: इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपला सतावतेय बंडखोरांची भिती

त्याच प्रमाणे यावेळी सुभाष नाईक जॉर्ज यांनी कंपनीने एका विभागात बेकायदेशीर पणे कंत्राटी परप्रांतीय कामगारांना कामावर ठेऊन काम सुरू ठेवले आहे, त्याच प्रमाणे कंपनीने कामगारांच्या मागण्या प्रलंबित ठेऊन कामगार कायद्याचा भंग केला असून, त्यामुळे चतूर्थी नंतर कंपनीला पाच दिवसांची संपाची नोटीस देण्याचा निर्णय झाला असल्याचे शेवटी सांगितले. या प्रमाणे घेतलेल्या निर्णयाला उपस्थित सर्व कामगारांनी पाठिंबा दिला असल्याने येणाऱ्या काळात सदर मागण्या मान्य न केल्यास चतूर्थी नंतर हे प्रकरण बरेच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com