Ponda accident
Ponda accidentDainik Gomantak

Goa Accident: फोंड्यात दुर्दैवी घटना! डिव्हायडरला धडकून पेंटिंग कंत्राटदाराचा मृत्यू

Curti Ponda Accident: कुर्टी-फोंडा येथे झालेल्या अपघातात पेंटींग कंत्राटदार चंदकिशोर नानगावा जागीच ठार झाला आहे
Published on

फोंडा: गोव्यात सध्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या अपघातांमुळे वाहनचालकांचा धोका निर्माण झालाय. मंगळवार (दि.४)रोजी दुपारी २-२:३०च्या सुमारास एका आत्मघाती अपघात झालाय. कुर्टी-फोंडा येथे झालेल्या या अपघातात पेंटींग कंत्राटदार चंदकिशोर नानगावा (वय ५५) जागीच ठार झाला आहे.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार पेंटींग कंत्राटदार चंदकिशोर फोंड्याहून उसगांवच्या दिशने जात होता. यावेळी अचानक त्याचा तोल गेल्याने बाजूच्या डिव्हायडरला त्याचं डोकं आपटलं. हा मार तीव्र असल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय.

Ponda accident
Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर पेडणे येथे अपघात, कोल्हापूरचा दुचाकी चालक गंभीर जखमी

कुर्टी महामार्गावर झालेल्या या अपघातातील मृत व्यक्ती चंदकिशोर नानगावा उसगांव येथे पेन्टिंगचे काम करण्यासाठी आला होता आणि दरम्यान त्याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या साथीदारांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांचा तपास सुरु आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर पेडणे येथे अपघात

गोवा महामार्गावर मालपे - पेडणे येथे दोन ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला होता. यात कोल्हापूरचा दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. गुरूवारी, २७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाच वाजता हा अपघात घडला होता. राष्ट्रीय महामार्ग ६६ वर मालपे - पेडणे येथे एक कंटेनर आणि ट्रक तसेच दुचाकी यांच्यात पहाटे हा अपघात झाला. कोल्हापूरातून गोव्यात येत असलेल्या दुचाकी चालक या अपघातात गंभीर जखमी झाला असून जखमी दुचाकी चालकाला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात (अझिलो) दाखल करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com