Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident: अपघाताचा थरार! वाळपईत विंगर गाडी आणि ट्रकची धडक, सुदैवानं जीवितहानी टळली

Valpoi Accident: ठाणे मार्गावर स्टेट बँकसमोर विंगर गाडी आणि ट्रिपर ट्रक यांच्यात अपघात झाल्याची घटना मंगळवारी (२५ फेब्रुवारी) घडली आहे.
Published on

वाळपई: ठाणे मार्गावर स्टेट बँकसमोर विंगर गाडी आणि ट्रक यांच्यात अपघात झाल्याची घटना मंगळवारी (२५ फेब्रुवारी) घडली आहे. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र विंगर गाडीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.

आज मंगळवारचा बाजार असल्यानं या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी होती. अपघातामुळं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र विंगर आणि ट्रिपर चालकांच्या जबाबांनंतर पुढील तपास केला जाणार आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनचालकांना मदत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास हातभार लावला.

Goa Accident
Goa Weather: फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा! वाढत्या तापमानामुळे गोवेकर हैराण; विजेच्या वापरात लक्षणीय वाढ

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी वाळपई पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com