Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर पेडणे येथे अपघात, कोल्हापूरचा दुचाकी चालक गंभीर जखमी

Malpe-Pernem NH-66 Accident: राष्ट्रीय महामार्ग ६६ वर मालपे - पेडणे येथे एक कंटेनर आणि ट्रक तसेच दुचाकी यांच्यात पहाटे हा अपघात झाला.
Goa Accident
Goa Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: मुंबई - गोवा महामार्गावर मालपे - पेडणे येथे दोन ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात कोल्हापूरचा दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (गुरूवारी, २७ फेब्रुवारी) पहाटे साडे पाच वाजता हा अपघात घडला.

राष्ट्रीय महामार्ग ६६ वर मालपे - पेडणे येथे एक कंटेनर आणि ट्रक तसेच दुचाकी यांच्यात पहाटे हा अपघात झाला. कोल्हापूरातून गोव्यात येत असलेल्या दुचाकी चालक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकी चालकाला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात (अझिलो) दाखल करण्यात आले आहे. दुचाकीवर असलेला दुसरा व्यक्ती देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Goa Accident
Viral Post: 'मी गोवा आणि भारताचा तिरस्कार करतो, राज्य सुरक्षित नाहीये, CM इतिहास पुन्हा लिहण्यात व्यस्त'; व्हायरल पोस्ट

मालपे- पेडणे जंक्शन धोकादायक असून याठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी २०२४ मध्ये नव्याने खुल्या करण्यात आलेल्या येथील मार्गावर सुरुवातीला दरड कोसळली नंतर मातीचा मोठा भराव रस्त्यावर कोसळल्याने नवा मार्ग जून २०२४ पासून वाहतुकीसाठी बंद आहे. दरम्यान, या मार्गवरील वाहतूक जुन्या मार्गावरुन वळविण्यात आली आहे. मात्र, या मार्गावर अपघाताचा धोका अद्याप तसाच आहे,

Goa Accident
Goa: 'गोव्यात शिवशाही नव्हती, शिवरायांमुळे थांबले नाही धर्मांतरण, CM सावंतांनी सांगितलेला इतिहास खोटा'; उदय भेंब्रे

सरकार मार्गावरील मातीचा भराव हटविण्याचे काम संथ गतीने करत असून, कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन धारकांनी केला आहे. जुन्या मार्गावरील समस्या जैसे थे असल्याने अपघाताचा धोका देखील तसाच आहे. मुंबईतून गोव्यात येणारा हा मुख्य मार्ग असल्याने हा मार्ग सातत्याने व्यस्त असणारा मार्ग आहे. मात्र, मालपे येथील जंक्शनवरील धोका लक्षात घेऊन प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com