Goa Accident: गणेशोत्सवाच्या तोंडावर अपघातांचे सत्र, रविवारी चार अपघातात 15 जखमी, एक ठार

गोमेकॉत उपचार सुरू; चालू वर्षात 192 जणांचे गेले बळी
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident राज्‍यात अपघातांचे सत्र सुरूच असून ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर गेल्या 24 तासांत झालेल्या 4 अपघातांत 15 जण जखमी, तर डुलकीने एकाचा बळी घेतला.

पर्वरीत कारच्‍या स्‍वयंअपघातात चालक जागीच गतप्राण झाला, तर शिरोड्यात कदंबची झाडाला धडक बसून 11 प्रवासी जखमी झाले. बांदोडा येथे क्रेनच्‍या धडकेत एक, तर साखळीत कारने अन्य दोन वाहनांना ठोकरल्यामुळे तिघांना जोरदार मार बसला.

गणेश चतुर्थीच्‍या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असून, वाहतूक पोलिसांवर ताण वाढणार आहे. यंदा नऊ महिन्‍यांत अपघात बळींचा आकडा 192 वर पोहोचला असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

पर्वरीतील अपघातात चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याचा अद्याप समजलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर याचा उलगडा होईल. मात्र, रस्त्यावरच थांबवल्या जाणाऱ्या वाहनांचा प्रश्‍न गंभीर आहे.

पर्वरीतील घटनेत भर रस्त्यावरच कंटेनर बंद पडला. तो बाजूला करण्यासाठी तातडीने प्रयत्न झाले असते, तर कदाचित हा अपघात टळला असता, असेही मत व्यक्त केले जात आहे. शिरोडा येथील अपघातात ३ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या.

सोनम बेतोडकर (वय २६), तनिश गावकर (८), पूजा गावकर (३३) यांना प्रथमोपचारानंतर घरी पाठवण्यात आले. सुचिता गावकर (४०) यांना गोमेकॉत, तर सुनीता गावकर (४३), अनिशा वेळीप, चंद्रिका गावकर (४१), सुलभा गावकर (४९), येसू वेळीप (६०), राघोबा नाईक (५९), गुणा गावडे (५७) यांना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. फोंडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

ताबा सुटला अन् घात झाला

पर्वरी : येथील गौरी पेट्रोल पंपजवळ पहाटे ३ वाजण्‍याच्‍या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरात धडक बसली. ही कार रस्त्यावर बंद पडलेल्या एका कंटेनरवर पाठीमागून जोरात आदळली.

या अपघातामध्ये कारचालक संतोष दोड्डामणी (वय 30, रामनगर-बेती) याचा जागीच मृत्‍यू झाला. झोप अनावर झाल्‍याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे, असा कयास पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

मदतीला गेलेल्या क्रेनलाच अपघात

धारबांदोडा : बांदोडा-फोंडा येथील उड्डाण पुलावर क्रेन आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्‍ये अपघात झाला. यावेळी क्रेनचालक जखमी अवस्‍थेतच केबिनमध्ये अडकला. हा अपघात सकाळी 11 वाजता घडला.

ही क्रेन शिरोडा येथील अपघातग्रस्त बस बाजूला काढण्यासाठी निघाली होती. तेथे जाण्यापूर्वीच ही क्रेन अपघातग्रस्त झाली.

जखमी क्रेनचालक मिथुनकुमार (वय २५ वर्षे) याला गोमेकॉत दाखल केले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.

Goa Accident
Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांचा दणदणीत विजय; चंडीगडला नमविले

मोठा अनर्थ टळला

पाज-शिरोडाहून पणजीला जाणाऱ्या कदंब बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने ती आंब्याच्या झाडाला धडकली. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. कदंबच्या जीए-०३ एक्स-o४१४ या क्रमांकाच्या बसला हा अपघात आज सकाळी ७.३०च्‍या सुमारास झाला.

स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस झाडावर जोरात धडकली. हे झाड नसते तर पुढे मोठ्या खाईत बस कोसळली असती. बस झाडाला धडकल्यामुळे संभाव्य धोका टळला. जखमींना काराय- शिरोडा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.

साखळीत कारची २ वाहनांना धडक : साखळी : गोकुळवाडी-साखळी येथे आज तीन वाहनांमध्‍ये अपघात झाला. कारचालकाला डुलकी लागल्‍यामुळे त्‍याचे नियंत्रण सुटले आणि कारची मालवाहू गाडी आणि दुचाकीला धडक बसली. या अपघातात तिघेजण जखमी झाले. त्‍यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

Goa Accident
Chhattisgarh: येत्या 5 वर्षांत गोवा राज्यावरील कर्जाचा बोजा कमी करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com