Goa CM Pramod Sawant In Chhattisgarh: चांगल्यारितीने आर्थिक व्यवस्थापन करुन येत्या 5 वर्षांत गोवा राज्यावरील कर्जाचा बोजाही कमी होणार आहे. राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यासाठी सेबी, नाबार्ड यांच्याकडून कमी व्याजदरात कर्ज घेत आहोत. राज्याची अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येऊ लागली आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
छत्तीसगढमध्ये भाजपची परिवर्तन यात्रा सुरु असून 85 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत सध्या छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत.
छत्तीसगढ दौऱ्यावर असताना रविवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना स्थानिक पत्रकारांनी गोव्यातील अर्थव्यवस्थेवर आधारित प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "गोवा राज्यातील खाण व्यवसाय 10 वर्षांसाठी बंद होता तसेच कोरोना काळात पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता."
"दरम्यान, आता पुन्हा एकदा गोव्यातील खाण व्यवसाय सुरु झाला आहे. तसेच पर्यटन व्यवसायही चांगला सुरु आहे. राज्यात सार्वजनिक खाजगी भागीदारीत आम्ही मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे".
"मोपा विमानतळामुळे सरकारला 37 टक्के महसूल मिळत आहे. आर्थिक व्यवस्थापन करुन राज्यावरील कर्ज 5 वर्षांत कमी करु" असे सांगितले.
यूनिफॉर्म सिविल कोड बाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, "यूनिफॉर्म सिविल कोडचे मी स्वागत करतो. गोवा राज्यात यूनिफॉर्म सिविल कोड गोवा मुक्ती संग्रामापासून चालत आला आहे. राज्यातील सर्व धर्मीय यूनिफॉर्म सिविल कोडचे स्वागत करतात. भारतात यूनिफॉर्म सिविल कोड लागू करण्याच्या मागणीचे मी स्वागत करतो" असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.