Chhattisgarh Women’s T20 Cup 2023: टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांचा दणदणीत विजय; चंडीगडला नमविले

तरन्नुम, सुनंदाची प्रभावी फलंदाजी
Tarannumbanu Pathan And Yetrekar Sunanda
Tarannumbanu Pathan And Yetrekar SunandaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Women CC Won By 9 Wickets: छत्तीसगड महिला टी-20 कप क्रिकेट स्पर्धेत रविवारी गोव्याने दणदणीत विजयाची नोंद केली. तरन्नुम पठाण व सुनंदा येत्रेकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 80 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे त्यांनी चंडीगडला नऊ विकेट राखून आरामात हरविले.

सामना छत्तीसगडमधील नया रायपूर येथील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला.

Tarannumbanu Pathan And Yetrekar Sunanda
'छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा'; महाराष्ट्रासह गोव्यात विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजन

गोव्याच्या गोलंदाजांनी अगोदर चंडीगडला ७ बाद १०९ धावांत रोखले. गोव्याच्या पाहुण्या गोलंदाज तरन्नुम पठाण व प्रियांका कौशल यांनी शानदार मारा करताना प्रत्येकी दोन विकेट प्राप्त केल्या.

नंतर गोव्याच्या सीनियर महिला संघाने १३.४ षटकांत १ बाद ११० धावा करून सोप्या विजयाची नोंद केली. तरन्नुमने ३२ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ४६, तर सुनंदा येत्रेकर हिने ३१ चेंडूंत पाच चौकारांसह ४२ धावा केल्या.

स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश आहे. गोवा, चंडीगड या संघांसह विदर्भ, ओडिशा व यजमान छत्तीसगडच्या ब्ल्यू व रेड या दोन संघांचा समावेश आहे.

संक्षिप्त धावफलक

चंडीगड महिला: २० षटकांत ७ बाद १०९ (मोनिका पांडे १६, आराधना बिश्त २१, शिवांगी यादव नाबाद २४, प्रियांका सिंग ३२, शिखा पांडे ४-०-२०-१, पूर्वा भाईडकर २-०-५-०, तरन्नुम पठाण ४-१-२२-२, सुनंदा येत्रेकर ४-०-३१-०, प्रियांका कौशल ४-१-१६-२, दीक्षा गावडे २-०-८-१) पराभूत

वि. गोवा महिला: १३.४ षटकांत १ बाद ११० (पूर्वजा वेर्लेकर १२, तरन्नुम पठाण नाबाद ४६, सुनंदा येत्रेकर नाबाद ४२, प्रियांका सिंग २-०-१०-१).

Tarannumbanu Pathan And Yetrekar Sunanda
SIT Goa: हनी ट्रॅप प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नियुक्ती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com