Goa Accident: कदंब बस आणि मालवाहू जीप यांच्यात समोरासमोर धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!

Goa Accident: रेडेघाटी मार्गावर मंगळवारी सकाळी कदंबची इलेक्ट्रिक बस व मालवाहू जीप यांच्यात समोरासमोर धडक झाली.
Goa Accident between Kadamba electric bus and cargo jeep on Rede Ghati route
Goa Accident between Kadamba electric bus and cargo jeep on Rede Ghati routeDainik Gomantak

Goa Accident: रेडेघाटी मार्गावर मंगळवारी सकाळी कदंबची इलेक्ट्रिक बस व मालवाहू जीप यांच्यात समोरासमोर धडक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्यावर ठेवलेल्या बांधकाम साहित्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

वाळपई होंडा मार्गावरील रेडेघाटी येथील एका वळणार संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथे दोन वाहनांना बाजू घेण्यास अडचण होते. त्यात वळण असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही.

Goa Accident between Kadamba electric bus and cargo jeep on Rede Ghati route
Goa Accidents: वेगाची नशा! कुर्टी, वास्को, सांगे, कुळेत अपघाताच्या घटना; थोडक्यात वाचले जीव

मंगळवारी सकाळी धावे येथून कदंबची इलेक्ट्रिक बस प्रवाशांना घेउन निघाली असता रेडीघाटी येथील वळणार समोरून येणाऱ्या भाजीवाहू जीपला धडकली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. बस मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली. वाळपई पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

Goa Accident between Kadamba electric bus and cargo jeep on Rede Ghati route
Goa Accident: झोपेत असताना काळाचा घाला, वेर्णा IDC मध्ये बसने चिरडल्याने बिहारच्या 4 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी

रस्ता मोकळा करण्याची मागणी

रस्त्यावर टाकलेले बांधकाम साहित्यामुळे वारंवार अपघाताचे प्रसंग उद्‍भवत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन कंत्राटदाराला हे साहित्य हटविण्यास भाग पाडावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com