Konkani Language: कोकणीतूनच व्यवहार करा, एम. व्यंकय्या नायडू

Konkani Language: गोव्यात वास्तव्यास असणाऱ्या इतर राज्यातील लोकांनी कोकणी बोलली पाहिजे
M. Venkaiah Naidu
M. Venkaiah NaiduDainik Gomantak

Konkani Language: गोव्यात वास्तव्यास असणाऱ्या इतर राज्यातील लोकांनी कोकणी शिकली आणि बोलली पाहिजे. कारण गोव्यातील बिगरगोमंतकीयांची जन्मभूमी वेगळी असली तरीही कर्मभूमी गोवा असल्याने कोकणीतून व्यवहार करणे आवश्यक असल्याचे मत माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

M. Venkaiah Naidu
54th IFFI: 54 व्या ‘इफ्फी’ची जोरदार तयारी सुरू ‘सुकाणू समिती’ ची आठवड्याभरात बैठक

एम. व्यंकय्या नायडू हे बुधवारी 1 रोजी राजभवन येथे 8 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नायडू म्हणाले, कोणत्याही राज्याच्या माणसाला त्याच्या मायबोलीबद्दल, संस्कृतीबद्दल आणि मायभूमीबद्दल अभिमान असणे गरजेचे आहे. गोवेकरांनी कोकणी भाषेचा प्रचार, प्रसार तसेच दैनंदिन जीवनात वापर करायला हवा. तसेच इतर राज्यातील लोकांनीही कोकणीतून व्यवहार करणे आवश्यक आहे. गोव्यात गेली अनेक वर्षे इतर राज्यातील लोक राहात आहेत आणि काम करत आहेत. गोव्याच्या विकासात या लोकांचेही मोलाचे योगदान आहे.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, या कार्यक्रमात मला अत्यंत आनंद झाला. भारतात पहिल्यांदाच राज्यांच्या स्थापनेचा उत्सव साजरा होत आहे. हा आपल्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे.

औपचारिक कार्यक्रमानंतर पंजाब, केरळ, कर्नाटक आणि इतर राज्यातील लोकांनी आपल्या सांस्कृतिक वेशभूषेत स्थानिक नृत्यकला प्रस्तुत केली. यावेळी विविध राज्यातील प्रतिनिधींनी माजी राष्ट्रपतींना भेटवस्तू प्रदान केल्या.

आम्ही प्रथम भारतीय!

नायडू यांनी सरदार पटेल यांची आठवण सांगितली. एक भारत, श्रेष्ठ भारत रचण्यासाठी माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनेक राज्यांना एकत्रित आणले आणि विविधतेत एकता कशी टिकवायची, हे दाखवून दिले असे आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि नंतर बाकी प्रांतातले, हे आम्ही विसरता काम नये, असेही ते यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com