थकीत रकमेचा हिस्सा भरला; उर्वरित रक्कमही देण्यास तयार, 'आप'च्या गीतेश नाईकांना कोर्टाचा दिलासा; अजामीनपात्र वॉरंट रद्द

Gitesh Naik Non-bailable warrant cancelled: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश गोकुळदास नाईक यांनी थकीत रकमेचा काही हिस्सा शनिवारी न्यायालयात जमा केला.
Gitesh Naik Non-bailable warrant cancelled
Gitesh Naik Non-bailable warrant cancelledDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश गोकुळदास नाईक यांनी थकीत रकमेचा काही हिस्सा शनिवारी न्यायालयात जमा केला. तसेच उर्वरित रक्कमही देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या या सकारात्मक पावलाची दखल घेत मेरशी येथील ‘जेएमएफसी’ न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

श्‍यामसुंदर मिरजकर यांनी दाखल केलेल्या खटल्यात गीतेश नाईक यांच्यावर २०२३ पासून कायदेशीर कारवाई सुरू होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी नाईक यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावली. वकिलांमार्फत त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, ते उर्वरित रक्कम अदा करण्यास तयार आहेत.

Gitesh Naik Non-bailable warrant cancelled
Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

नाईक यांनी ठरावीक रक्कम तक्रारदाराला अदा केली, ज्याची नोंद न्यायालयाने घेतली आहे. उर्वरित सर्व रक्कम आजच भरण्याची माझी तयारी आहे, अशी लेखी ग्वाही देखील नाईक यांनी शनिवारी न्यायालयात दिली आहे.

नाईक यांनी स्वतःहून रक्कम भरल्याने त्यांचा हेतू चांगला असल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ३० मार्च रोजी दिलेला वॉरंटचा आदेश रद्द केला.

फोंड्यात ९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानाला केवळ ५ दिवस उरले असतानाच नाईक यांच्यावरील कायदेशीर कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले होते. मात्र, आज कोर्टात रक्कम भरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याने नाईक यांच्या प्रचाराचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Gitesh Naik Non-bailable warrant cancelled
Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

तक्रारदाराच्या वकिलांनी तांत्रिक कारणास्तव तक्रार आजच मागे घेण्यास नकार दिला असला, तरी वॉरंट रद्द झाल्याने नाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे २०२६ रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com