कामराभाटमधील 72 कुटुंबांना निवासाचा ताबा सोडण्याची नोटीस

ताळगाव पंचायतीची कारवाई: महानगरपालिकेच्या सूचनेनुसार उचलले पाऊल
कामराभाट
कामराभाटDainik Gomantak
Published on
Updated on

Talgaon Panchayat: कामराभाट येथील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या निवासी गाळ्यांच्या तीन इमारती खाली करण्याची नोटीस तेथे राहणाऱ्या कुटुंबांना ताळगाव पंचायतीने दिली आहे. ५८ वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या या इमारतीचे आयुर्मान संपलेले आहे, त्यामुळे पंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून ही नोटीस बजावली आहे.

कामराभाट
Panjim Municipal Corporation: महानगरपालिकेच्या नूतन इमारतीला मुहूर्त कधी?

पणजी महानगरपालिकेने ताळगाव पंचायतीला ३० डिसेंबर २०२२ रोजी नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने आल्तिनो येथील सरकारी तंत्रनिकेतनच्यावतीने कामराभाट येथील इमारतींचे १४ जून २०२२ रोजी अमित मोरूडकर (एमई, श्रेणी-३) यांच्यासह पाहणी करून इमारतीच्या स्थितीबाबत अहवाल करण्यात आला. त्यामध्ये त्या ठिकाणी ए, बी आणि सी अशा तीन इमारती आहेत आणि तळमजला व वर दोन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर आठ निवासी गाळे आहेत, अशाप्रकारे एकूण ७२ निवासी गाळे आहेत.

इमारतींच्या देखभालीकडे दुर्लक्ष

या तिन्ही इमारतींचे ५८ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेले असून त्या विपन्नावस्थेत आहेत. या इमारतींच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले गेले आहे. तेथे राहणाऱ्या लोकांनी इमारतीची देखरेख न केल्याने आरसीसी बांधकामाची अपरिमित हानी झालेली आहे. देखभालीकडे दुर्लक्ष, सद्यःस्थितीतील बांधकाम दोष, जुन्या स्थितीतील वीजवाहिन्या, जुन्या पाण्याच्या वाहिन्या, सांडपाणी व्यवस्था, दर्जारहित स्थिती या सर्व बाबी या इमारतींमधील रहिवाशांच्या आरोग्याला धोकादायक व हानिकारक आहेत. त्यामुळे गोवा पंचायत राज कायदा १९९४ अन्वये कार्यवाही करावी, असे महानगरपालिकेने पंचायतीला कळविले आहे.

कामराभाट
Goa Check Post: चेकनाक्यांवर वाहन तपासणीकडे दुर्लक्ष!

सात दिवसांत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन: महानगरपालिकेने कळविल्यानुसार पंचायतीने गोवा पंचायत राज कायदा १९९४ च्या कलम ७६(१) अंतर्गत १५ मे २०२३ रोजीच्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावानुसार तेथे राहणाऱ्या कुटुंबांना तिन्ही इमारती पाडण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आलेली आहे. जर कोणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यासह पंचायतीकडे सूचना स्वीकृत झाल्यापासून सात दिवसांच्या आत येऊन पंचायतीला आपली बाजू पटवून द्यावी, असे सूचित केलेले आहे.

त्या इमारती ताळगाव पंचायत क्षेत्रात येतात. महानगरपालिकेने आम्हाला निर्देश दिले होते, त्यानुसार आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना त्या खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. इमारती फार जुन्या आहेत, त्यामुळे हे पाऊल उचलणे आवश्‍यक होते.

- जानू रुझारिओ, सरपंच, ताळगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com