Goa Crime: वादावादीतून चेहऱ्यावर, नाकावर बुक्क्यांनी मारहाण; अपुरे पुरावे आणि साक्षीदार अनुपस्थित; आरोपीची झाली निर्दोष सुटका

Vagator Crime: सुनावणीनंतर न्यायालयाने अभियोक्त्याचा दावा अपुऱ्या पुराव्यांमुळे फेटाळला. निर्णयात नमूद करण्यात आले की मुख्य तक्रारदार व त्यांची पत्नी न्यायालयासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहिली नाहीत.
Court Order
CourtCanva
Published on
Updated on

पणजी: म्हापसा येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाने दिल्लीतील मनोज बत्रा (५७) यांची मारहाण, शिवीगाळ व धमकीप्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्णय न्यायाधीश ज्युड टोरेक्स सिक्वेरा यांनी शुक्रवारी दिला.

ही कारवाई हणजूण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात होती. ३ जून २०२२ रोजी वागातोर येथील एका निवासी इमारतीसमोर झालेल्या वादातून बत्रा यांनी तक्रारदार जगदीश चावला यांच्या चेहऱ्यावर व नाकावर मुठीने मारहाण करून किरकोळ फ्रॅक्चर केले, तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप होता.

Court Order
Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

मात्र, तीन वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने अभियोक्त्याचा दावा अपुऱ्या पुराव्यांमुळे फेटाळला. निर्णयात नमूद करण्यात आले की मुख्य तक्रारदार व त्यांची पत्नी न्यायालयासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहिली नाहीत. तपास अधिकारी पोलिस हवालदार श्याम अनुर्लेकर यांनी साक्ष देताना सांगितले की, तक्रारदार व त्यांची पत्नी शोधूनही सापडले नाहीत, त्यामुळे त्यांची उपस्थिती सुनिश्चित करता आली नाही.

Court Order
Sawantwadi Crime: 'ती' आत्महत्या कौटुंबिक कारणामुळेच? मोती तलावात उडी घेणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह 17 तासांनी सापडला

न्यायाधीश सिक्वेरा यांनी निरीक्षण केले की, अभियोक्त्याने कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर केलेला नाही. त्यामुळे आरोपीने गुन्हा केल्याचे कोणाच्याही तोंडी सिद्ध झालेले नाही. परिणामी, न्यायालयाने आरोपीस शंका लाभ देत सर्व कलमांखाली मुक्तता दिली. मनोज बत्रा यांच्यावर कलम ३२३, ३२४, ३२५, ५०४ व ५०६(२) या कलमांखाली आरोप ठेवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Anmod Forest Murder Case
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Tarun Tejpal Sexual Assault Case
Mapusa Child Assault Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com