Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

Manipur Youth Death In Goa: कांदोळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 28 वर्षीय मणिपुरी तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
Manipur Youth Death In Goa
DeathDainik Gomantak
Published on
Updated on

Manipur Youth Death In Goa: कांदोळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 28 वर्षीय मणिपुरी तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. शुक्रवारी (10 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजून 19 मिनिटांनी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पोलिसांना फोन आला, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

मृतदेहाची ओळख आणि प्राथमिक माहिती

दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ तपास सुरु केला. मयत तरुणाचे नाव मोहम्मद वास्तम खान (Md. Wastam Khan) (वय 28) असे आहे. तो मूळचा मणिपूरमधील थौबल (Thoubal, Manipur) जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याच्या वडीलाचे नाव मोहम्मद सुलेमान आहे. मोहम्मदला मृत अवस्थेतच रुग्णालयात (Hospital) आणण्यात आले होते, अशी माहिती आरोग्य केंद्राने पोलिसांना दिली.

Manipur Youth Death In Goa
Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

बेशुद्धावस्थेत सापडला

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदोळी (Candolim) पोलिसांनी वास्तम खानच्या सोबत असलेल्या मित्राची चौकशी केली. या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती समोर आली. मृतकाला दीर्घकाळ दारुचे व्यसन (Chronic Alcoholic) होते. कांदोळी येथील त्याच्या भाड्याच्या खोलीत तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याच्या मित्रांनी त्याला त्वरित रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Manipur Youth Death In Goa
Goa Casino Crime : गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

पोलिसांची पुढील कारवाई

कांदोळी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा पूर्ण केला. सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक (PSI) स्नेहल मलिक यांच्यामार्फत सुरु आहे. तरुणाच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण आहे, हे पोस्टमार्टम (Post Mortem) रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com