Domestic Flights साठी 'मोपा'वर 100 उड्डाणांची मागणी; 'दाबोळी'चे काय?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला विकास कामांचा आढावा
Domestic Flights
Domestic FlightsDainik Gomantak

गेल्या अनेक दिवसांपासून मोपा विमानतळ चांगलेच चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळाच्या कामकाजाचा आढावा घेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी गोवा व मुख्यमंत्री यांच्यासह जीएमआरचे अधिकारी ही यावेळी उपस्थितीत होते.

(GGIAL CEO Ranganathan Sheshan inform Domestic airlines seek 100 slots at Mopa )

याबाबत माहिती देताना जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे (GGIAL) कार्यकारी अधिकारी रंगनाथन शेषन म्हणाले की, येत्या डिसेंबरपासून देशांतर्गत उड्डाने सुरु होणार आहेत. यासाठी सुमारे 100 उड्डाणांची मागणी डोमेस्टीक विमान कंपन्यांनी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामूळे दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळाचं भविष्य काय? असा प्रश्नपुन्हा सर्वत्र चर्चेत आला आहे.

Domestic Flights
Goa Accident: शनिवार ठरला घातवार! एका दिवसात तिघांचा मृत्यू

शेषन यावेळी बोलताना म्हणाले की, विमानळावरील उड्डाणांची संख्या वाढत जाईल त्याप्रमाणे अधिक उड्डाणांसाठी परवानगी मिळू शकते. तसेच जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील असा ही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या विमानतळावर सुमारे 5,000 हून अधिक लोक अहोरात्र काम करत आहेत. तसेच मोपा विमानतळाचे 95% पेक्षा जास्त कामे पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Domestic Flights
Goa Education: प्राथमिक शिक्षकांच्या 88 पदांसाठी मुलाखती

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी माहिती दिली की, आता केवळ आणखी 15 दिवसांत उर्वरीत कामे पूर्ण होतील. ही सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्यानंतर उद्गघाटनासाठी पंतप्रधान कोणती तारीख देऊ शकतात याची वाट आम्ही पाहत आहोत. तात्पुरते, आम्हाला 8 डिसेंबर नंतरच्या तारखेची अपेक्षा आहे. मात्र याबाबत पंतप्रधानच निर्णय घेतील असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com