Goa Accident: शनिवार ठरला घातवार! एका दिवसात तिघांचा मृत्यू

राज्यात गेल्या काही तासात गमावले तिघांनी आपले प्राण
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गेल्या काही तासात तिघांनी आपले प्राण गमावले आहेत. यापार्श्वभूमीवर पोरस्कडे, पेडणे येथील रेल्वे मार्गावर एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रमेश गावकर (वय 52) असे आहे. गावकर हे रेल्वे रुळ पार करत असताना हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

(Three people have died in an accident at betora Pernem and kurti in Goa )

Goa Accident
Fraud News: सुएलांकडून तक्रार मागे

मिळालेल्या माहितीनुसार पोरस्कडे, रमेश गावकर यांचा पेडणे येथील रेल्वे मार्गावर मृत्यू झाला आहे. आज सकाळी काही नागरीक रुळावरुन जात असताना त्यांचा मृतदेह आढळला आहे. याबाबत माहिती देताना स्थानिकांनी सांगितले की, गावकर हे रेल्वेरुळाच्या पलिकडे कधी येत नाहीत. मात्र रात्री त्यांनी असा प्रयत्न केला असून यावेळी रेल्वेच्य़ा धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

Goa Accident
Goa News: मडगाव पालिकेतील वैधानिक समित्यांची एकमताने निवड

स्थानिकांनी एकत्र येत रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा प्रकारे चार ते पाच वेळा अपघात घडले आहेत. त्यामूळे येथून जाताना आणखी अपघात घडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी प्रवासायोग्य मार्ग करावा अथवा नागरिकांना अशाप्रकारे मृत्यूला सामोर जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती केली आहे.

कुर्टी फोंडा येथे महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात

दरम्यान अशाच प्रकारे कुर्टी फोंडा येथे महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीत मृत्यू झाला. अशोक श्याम नाईक (वय 47) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अशोक नाईक हे मूळचे बागवाडा, खांडेपार येथील रहिवाशी होते. ते काही कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडले असता महामार्गावर आमिगोज जंक्शन येथे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

चेंबरचं झाकण उघडं असल्याने कामगाराचा गेला बळी

अशा प्रकरे बेतोड्यात खुल्या चेंबरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. बेतोडा जंक्शनवर असलेल्या या चेंबरमध्ये कामगार पडल्यानंतर तो पाण्यात बुडाला. या चेंबरचं झाकण उघडं असल्याने कामगाराला नाहक आपला जीव गमावावा लागला आहे. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच या चेंबरचं उद्घाटन केलं होतं. स्थानिकांनी प्रशासनाला अशाप्रकारे चेंबर खुलं ठेवण्याला जबाबदार धरलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com