Goa Wildlife: कारापूर परिसरात गव्यांचा वावर वाढला; शेतीची नासधूस, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्त करण्याची मागणी

Karapur Gaur Movement: कारापूर भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून, रात्री तसेच दिवसा हे गवे लोकवस्तीजवळ फिरत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
Karapur Gaur Movement
Goa WildlifeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: कारापूर भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून, रात्री तसेच दिवसा हे गवे लोकवस्तीजवळ फिरत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. कारापूर येथील ‘शिरांनी’ येथे हे गवे भरदिवसा मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत.

सोमवारी तर बराच वेळ हे गवे कारापूर येथील रस्त्यापासून काही अंतरावर चरत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. गेल्या वर्षी मिरची पिकाच्या हंगामात कारापूर भागात गव्यांचा संचार वाढला होता. मध्यंतरी गवे गायब झाले होते. त्यानंतर आता पुन्हा गव्यांचा संचार वाढला आहे. सध्या परिसरात गव्यांनी काही बागायती पिकांची नासधूस सुरू केली आहे.

Karapur Gaur Movement
Stray Cattle Problem: मये भागात मोकाट गुरांचा उच्छाद! रस्त्यांवर मृत्यूचा सापळा; नागरिक प्रचंड दहशतीत

गवे खाद्याच्या शोधात गावाकडे

गव्यांची संख्या आता सर्वत्र वाढली आहे. जंगल सोडून गवे लोकवस्तीजवळ येण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे घाट किंवा डोंगराळ परिसरात त्यांना खाद्य मिळणे दुरापास्त झाले आहे. खाद्याच्या शोधार्थ गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. अलीकडच्या काळात बहुतांश ग्रामीण भागांत गव्यांचे अस्तित्व जाणवत आहे, असे प्राणीमित्र अमृत सिंग यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Animal Gaur
Sattari Gaur Attackc
Karapur One Goa Project Protest
Bison In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com