Stray Cattle Problem: मये भागात मोकाट गुरांचा उच्छाद! रस्त्यांवर मृत्यूचा सापळा; नागरिक प्रचंड दहशतीत

Mayem Stray Cattle: मये भागात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या मोकाट गुरांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
Stray Cattle Problem
Mayem Stray CattleDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मये भागात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या मोकाट गुरांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत मये भागात एका दाम्पत्यासह काहीजणांवर गुरांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.दरम्यान, रस्त्यावरील मोकाट गुरांविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय मये पंचायतीने घेतला असला, तरी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

Stray Cattle Problem
Bison In Goa: फोंड्यात गव्यांचा भररस्त्यात 'नाईट आऊट'! खडपाबांध ते ढवळी परिसरात नागरिकांची उडाली घाबरगुंडी; वन खात्याकडे बंदोबस्ताची होतेय मागणी

त्यामुळे मोकाट गुरांविरोधात कारवाई कधी होणार, असा प्रश्न वाहनचालकांसह नागरिक उपस्थित करीत आहेत. मयेच्या ग्रामसभेत मोकाट गुरांचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी गुरे रस्त्यावर सोडल्यास या मोकाट गुरांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे तत्कालीन सरपंच सीमा आरोंदेकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता वर्ष उलटून गेले तरी अद्याप ठोस कारवाई सुरू झालेली नाही आणि मोकाट गुरांची समस्याही सुटलेली नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

गुरांची रस्त्यावर ठाण

मये भागात मोकाट गुरांची समस्या वाढत चालली आहे. केळबायवाडा ते हळदणवाडीपर्यंतच्या रस्त्यावर मोकाट गुरे सतत संचार करताना आढळून येतात. गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याचदा ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसलेली दिसतात. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील या गुरांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. वाहने चालविताना वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. गुरांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच लहान-मोठे अपघातही वारंवार घडत असतात.

Stray Cattle Problem
Bison Attack: गव्याच्या धडकेत तरुण गंभीर, रुग्णवाहिका तासभर पोचलीच नाही; ठोस उपाय योजना करण्याची स्थानिकांची मागणी

हल्ला करण्याच्या घटना

रस्त्यावरील गुरांकडून हल्ला करण्याचे प्रकारही घडत आहेत. दोन वर्षांपूर्वी केळबायवाडा येथे गुरांनी केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले होते. गावकरवाडा-मये येथील शिरोडकर दाम्पत्य स्कूटरवरून डिचोलीच्या दिशेने जात होते. केळबायवाडा येथे चढणीवर पोहोचताच रस्त्यावरील गुरांनी त्यांच्या स्कूटरला धडक दिली. त्यात शिरोडकर दाम्पत्य स्कूटरसह रस्त्यावर पडून जखमी झाले.

गुरांच्या बंदोबस्ताची मागणी

चार वर्षांपूर्वी केळबायवाडा येथे गुरांनी केलेल्या हल्ल्यात तेथीलच एका हॉटेलमालकाचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते. याशिवाय आणखी काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थ करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com