Panaji: पणजीत अजून दोन वर्षे पाईपमधून गॅस पुरवठ्यास विलंब! 'खोदकाम' परवानगीमुळे गोंधळ

Panaji Pipeline Gas: गोवा गॅस सर्व्हिस नावाच्या सरकारी कंपनीने उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यात पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट केंद्र सरकारकडून मिळवले आहे.
Panaji Pipeline Gas
gas supply delays in PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Gas supply pipeline goa panaji

पणजी: पणजीलगतच्या भागात पाईपमधून गॅस पुरवण्याच्या कामात रस्ते खोदकाम करण्यास परवानगी मिळण्यासाठी होणारा विलंब आणि त्यासाठी आकारले जाणारे भरमसाट शुल्क याचा अडसर आहे. यामुळे पूर्ण पणजी व आसपासच्या परिसरात पाईपमधून गॅस पुरवठा होण्यासाठी आणखीन दोन वर्षांहून अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे.

गोवा गॅस सर्व्हिस नावाच्या सरकारी कंपनीने उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यात पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट केंद्र सरकारकडून मिळवले आहे. पर्वरी येथे या कंपनीचे कार्यालय आहे. त्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पणजी शहर आणि फोंडा शहरात गॅस पाईपचे जाळे विणण्यासाठी बराच वेळ जाणार आहे.

केंद्र सरकारने उपयुक्तता (युटीलिटी) सेवा प्रकारात मोडणाऱ्या सेवांना सरकारने शुल्क आकारू नये असे म्हटले असतानाही राज्य सरकार गॅसची वाहिनी घालण्यासाठी रस्ता खोदकाम करण्यासाठी शुल्क आकारते. त्यात रस्ता कापण्यासाठी आणि रस्ता दुरुस्त करण्यासाठी वेगवेगळे शुल्क असते. त्यात कोणतीही सूट मिळत नसल्याने गॅसवाहिनी घालण्यापूर्वी ग्राहक किती मिळतील याचा विचार कंपनी करते. एखाद्या इमारतीपर्यंत गॅसवाहिनी घालायची असल्यास २५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. गॅस विक्रीतून तेवढी रक्कम मिळेल काय याचा विचार कंपनी करते.

इंधन स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल

कंपनीच्या म्हणण्यानुसार, गोव्यात पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्याची योजना हळूहळू विस्तारत आहे. या सुविधेमुळे घरगुती स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि सतत उपलब्ध इंधन मिळण्यास मदत होते, ज्यामुळे पारंपरिक इंधनांवर अवलंबित्व कमी होते.

पाईपद्वारे गॅस पुरवठा ही सुविधा तूर्त पणजी व फोंडा शहराच्या काही भागांत उपलब्ध आहे; परंतु संपूर्ण राज्यात तिचा विस्तार अद्याप पूर्ण झालेला नाही. या सुविधेच्या विस्तारासाठी राज्य सरकार आणि संबंधित एजन्सी प्रयत्नशील आहेत.

Panaji Pipeline Gas
Panaji: पणजीवासीयांचा त्रास '82' दिवसांनी संपणार? कामे संपवण्याची मुदत 31 मार्च; 'दर्जा'बाबत मात्र प्रश्नचिन्ह

पाईपद्वारे गॅस पुरवठ्यामुळे सिलिंडरच्या पुनर्भरणाची गरज नसल्याने घरगुती कामे सुलभ होतात. तसेच, हे इंधन स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल असल्याने आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

गोव्यातील काही भागांत पाईपद्वारे गॅस पुरवठा सुरू झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांना स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि सोयीचे इंधन मिळू लागले आहे.

पाईपद्वारे गॅस पुरवठा मिळवण्यासाठी, स्थानिक गॅस वितरण कंपनीशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो. त्यासाठी काही तांत्रिक आणि सुरक्षा निकष पूर्ण करावे लागतात.

साडेपाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. पाईपद्वारे गॅस पुरवठा ही सुविधा सुरक्षित आणि स्वच्छ असल्याने भविष्यात तिचा अधिकाधिक विस्तार होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या साडेपाच हजार घरांत पाईप गॅसचा वापर होतो. आणखीन चार हजार घरांना अशी सुविधा देण्याची सरकारची तयारी आहे.

Panaji Pipeline Gas
Panaji Goa: गोलमाल है भाई सब गोलमाल है! स्मार्ट पणजीत सापडले आणखी एक गांजाचे झाड, पाहा video

एका दिवसात ११ हजार किलो गॅसची विक्री

कुंडई, मडकई, बेतोडा, उसगाव औद्योगिक वसाहती, सत्तरीतील बियर प्रकल्पाला गॅसचा पुरवठा १४ पैकी १० औद्योगिक वसाहतींपर्यंत गॅस नेण्यात कंपनीला यश. ४१ हॉटेल्सनाही घेतला गॅस पुरवठा. आणखीन ७० हॉटेल्सनी गॅस पुरवठ्यासाठी अर्ज केले आहेत.

येत्या दोन दिवसांत मांडवी पॅलेट्‌स कंपनीला गॅसचा पुरवठा होणार. त्यासाठी बोरी-शिरोडा येथून कंपनीपर्यंत ११ किलोमीटरची गॅस वाहिनी घालण्यात आली आहे.

राज्यात सात ठिकाणी सीएनजी गॅस पुरवठा वाहनांसाठी केला जातो. येत्या काही महिन्यांत म्हापसा, करासवाडा आणि शिरसई येथे पुरवठा सुरू केला जाणार. सध्या ११ हजार किलो गॅसची विक्री एका दिवसात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com