Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak

Sudin Dhavalikar: चार वर्षांत मडकईचे रूप पालटणार- ढवळीकर

सुदिन ढवळीकर : पंचायत क्षेत्रातील भूमिगत वीजवाहिन्या कामाचा शुभारंभ
Published on

Sudin Dhavalikar येत्या चार वर्षांत मडकई मतदारसंघात सर्व खात्यांची विकासकामे पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांचा जे चांगले ते देण्यात येईल, असे उद्‌गार मडकईचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

मडकई येथे भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गेल्या शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मडकई पंचायतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, गणपत नाईक, मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस तसेच इतर वीज खात्याचे अधिकारी आणि मडकई मतदारसंघाचे पंचसदस्य आदी उपस्थित होते.

Sudin Dhavalikar
Goa News: खवय्यांसाठी थोडी खुशी थोडा गम, ‘मानकुराद’ चा दर घटला मात्र मासे महाग

सुदिन ढवळीकर म्हणाले की, वीज खात्याच्या माध्यमातून केवळ मडकईच नव्हे तर राज्यातील सर्वच मतदारसंघांत विजेच्याबाबतीत आवश्‍यक सुधारणा हाती घेण्यात येत आहेत.

गोवा राज्य विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्नरत असून ग्राहकांना विनाखंड वीजपुरवठा करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

मडकई पंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांना चालना देण्यात येत असून नागरिकांचे सहकार्य हे महत्त्वाचे आहे.

आमदार निधीतून मडकई मतदारसंघातील ढवळी भागातील दोन देवालयांचे सुशोभीकरण करण्यात येत असून सर्वप्रथम मडकई मतदारसंघाला या योजनेचा लाभ मिळत असल्याने विकासाची ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com