गावडोंगरी पंचायत इमारत कोसळण्याच्या स्थितीत;इमारतीला लावला टेकू

गेली चार वर्षे पंचायत कार्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असल्याने नवीन पंचायत वास्तू उभारावी ही मागणी करण्यात येते.
गावडोंगरी पंचायत इमारत.
गावडोंगरी पंचायत इमारत.Dainik Gomantak

काणकोण: गावडोंगरी पंचायत क्षेत्रात सुमारे नव्वद टक्के लोकसंख्या आदिवासीची आहे.ट्रायबल सबप्लान अंतर्गत या पंचायत क्षेत्रात विकास कामे करणे शक्य आहे. मात्र गेली चार वर्षे पंचायत कार्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असल्याने नवीन पंचायत वास्तू उभारावी ही मागणी करण्यात येते.

गावडोंगरी पंचायत इमारतीचा कोसळणारा स्लॅब.
गावडोंगरी पंचायत इमारतीचा कोसळणारा स्लॅब.Dainik Gomantak
गावडोंगरी पंचायत इमारत.
मंत्री मायकल लोबो दिल्लीत, काँग्रेसच्या वरिष्ठांना भेटण्याची दाट शक्यता

जुनी इमारत बांधल्यास सत्तावीस वर्षे झाली. पंचायत मंडळाने या संदर्भात वास्तूचा आराखडा तयार करून प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी आदिवासी कल्याण खात्याकडे ट्रायबल सबप्लान अंतर्गत वास्तूची उभारणी करण्यासाठी पाठवून दिला होता नंतर पंचायत खात्याने नवीन योजना तयार केेल्याने तो मंजूरीसाठी पंचायत खात्याकडे आला आहे.मात्र‌ निधी अभावी हा प्रस्ताव पंचायत खात्याकडे आहे. त्याला अद्याप वित्तीय मंजूरी मिळत नाही.त्याचप्रमाणे पंचायत इमारतीची जागा महसूल खात्याची म्हणजे सरकारच्या मालकीची आहे ती पंचायतीच्या ताब्यात देण्याची मागणी सरपंच सुमन गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडे सरकार तुमच्यादारी या कार्यक्रमावेळी जाहीररित्या केली.

गावडोंगरी पंचायत इमारत.
'इतर कुणी नेते फुटू नयेत' यासाठी काँग्रेसच्या हालचाली

सुमारे तीस वर्षांपूर्वी या इमारतीची उभारणी करण्यात आली होती पंचायत कार्यालय चार दुकाने व पहिल्या मजल्यावर सभागृह अशी या जुन्या वास्तूची रचना आहे.मात्र वास्तूचे कॉंक्रिट निघून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत त्यामुळे या वास्तूची मजबूती संशयास्पद झाली आहे त्यामुळे पंचायत कार्यालयाच्या स्लॅबला लोखंडी तुळयांचे टेकू लावण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सभागृह वापरण्यावर बंदी आणली आहे.त्यासाठी नव्या पंचायत वास्तू प्रस्तावाला लवकरांत लवकर वित्तीय मंजूरी देण्याची मागणी सरपंचांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.यावेळी उपसभापती इजिदोर फर्नाडीसही उपस्थित होते.मुख्यमंत्र्यानी या प्रस्तावाला वित्तीय मंजूरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com