Ganesh Chaturthi 2023 वाळपई सध्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा समाजप्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत.
ठाणे-सत्तरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे त्यापैकीच एक. गेल्या दहा वर्षांपासून या मंडळाच्या वतीने राष्ट्रीय विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या व्याख्यानांचा कार्यक्रम होत आहे.
टिळकांनी समाजप्रबोधन, भारतीय स्वातंत्र्य, सामाजिक ऐक्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. आज सार्वजनिक गणेशोत्सवात नेहमीच असंख्य प्रकारचे कार्यक्रम चालत असतात.
पण ज्या हेतूने टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो हेतू आज खराच साध्य होत आहे का, हा प्रश्नच आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानमाला झाली.
सुप्रसिद्ध व्याख्याते ॲड. शिवाजी देसाई हे व्याख्यान देतात. लोकांनी मोठी उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला.
ॲड. शिवाजी देसाई देतात व्याख्याने
आतापर्यंत या व्याख्यानांमध्ये माहिती अधिकार कायदा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,
मराठ्यांचा इतिहास, नेताजी सुभाषचंद्र बोस, सामर्थ्य आहे चळवळीचे अशा अनेक विषयांवर व्याख्याने झालेली आहेत. विशेष म्हणजे त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
यंदा देखील या सार्वजनिक गणेशोत्सवात ॲड. शिवाजी देसाई यांचे ‘छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची साडेतीनशे वर्षे’ या विषयावर व्याख्यान झाले.
सार्वजनिक गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचे कार्यक्रम होणे गरजेचे असते. त्याचबरोबर हे कार्यक्रम योग्य पद्धतीने व्हायला हवेत. म्हणूनच आम्ही ठाणे-सत्तरी सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्यानांचा कार्यक्रम ठेवत असतो.
- सुहास नाईक, ठाणे-सत्तरी
ठाणे गणेशोत्सवात होणाऱ्या व्याख्यानांच्या कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. राष्ट्रीय विचारांना प्रोत्साहन देणारी व्याख्याने ही काळाची गरज आहे व हे मंडळ कौतुकास पात्र आहे.
- गौरीश गावस,
सामाजिक कार्यकर्ते (मासोर्डे)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.