इंटरपोलचा ई मेल अन् मुंबई पोलिसांची धावपळ, नाट्यमय घटनेत तरुणाचा जीव वाचवण्यात यश

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना, सामान्यत: इंटरपोल म्हणून ओळखली जाते, ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरातील पोलीसाना गुन्हे रोखण्यास सहकार्य करते.
With the help of Mumbai Police, Interpol prevented the suicide of a young man in Mulund.
With the help of Mumbai Police, Interpol prevented the suicide of a young man in Mulund.Dainik Gomantak
Published on
Updated on

With the help of Mumbai Police, Interpol prevented the suicide of a young man in Mulund:

सहा महिन्यांपूर्वी नोकरी गेल्यानंतर दुसरी नोकरी आईला एका फौजदारी खटल्यात जामीन मिळत नसल्याने निराश झालेल्या मालाडच्या (मुंबई) 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्यासाठी वारंवार गुगल सर्च केला.

ही बाब गुगलवर नजर ठेवणाऱ्या इंटरपोलच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी तातडीने ई मेलद्वारे मुंबई पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी दोन तासांत या व्यक्तीला शोधून काढले आणि समुपदेशन करत आत्महत्येपासून रोखले.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना, सामान्यत: इंटरपोल म्हणून ओळखली जाते, ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जगभरातील पोलीसाना गुन्हे रोखण्यास सहकार्य करते.

या प्रकरणी मुंबई पोलिसांना मंगळवारी दुपारी इंटरपोलचा ईमेल प्राप्त झाला. इंटरपोलने इंटरनेट सर्च दरम्यान त्या व्यक्तीने वापरलेला मोबाईल नंबरही शेअर केला.

सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण आणि इतर कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या एका पथकाने मोबाइल नंबरबद्दल तांत्रिक माहिती गोळा केली आणि हा तरुण मालवणी, मालाड येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे आढळले.

With the help of Mumbai Police, Interpol prevented the suicide of a young man in Mulund.
पतीचे विवाहबाह्य संबंध स्वीकारणाऱ्या पत्नीला करता येणार नाही 'ही' मागणी, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

या तरुणाने पोलिसांना सांगितले की, तो मूळचा राजस्थानचा असून तीन वर्षांपूर्वी तो मुंबईत आला होता. ज्युनियर कॉलेजनंतर त्याने कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा केला. तो मीरा रोड येथील रिअल इस्टेट कार्यालयात नोकरीस होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली.

या तरुणाने पुढे सांगितले की, त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण नोकरी मिळू शकली नाही. तसेच तरुणाची आई गेल्या काही महिन्यांपासून एका फौजदारी गुन्ह्यात तरुंगात आहे. तिला सतत प्रयत्न करुनही जामीन मिळत नाही. तसेच आर्थिक समस्यांमुळे नैराश्यात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते.

With the help of Mumbai Police, Interpol prevented the suicide of a young man in Mulund.
Viral Video: 'यात्रेकरूंच्या' वेषात भिकारी पाठवू नका, अरब देशांची पाकिस्तानला विनंती

हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून गुगलवर सतत 'बेस्ट वे टू सुसाइड' असे सर्स करत होता. ज्याचे इंटरपोलच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावर तातडीने पाऊले उचलत त्यांनी तरुणाच्या मोबाइल फोन नंबरसह मुंबई पोलिसांना याबद्दल ईमेल पाठवला.

या माहितीच्या आधारे मोबाईल फोन वापरणारा तरुण मालवणी येथील असल्याचे गुन्हे शाखेला आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पीडित तरुणाला ताब्यात घेऊन समुपदेशन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com