

पणजी: राज्यात यंदा पावसाचा जोर मंदावलेला असल्याने अनेक भागात अजूनही मोठ्या प्रमाणात तुटवडा कायम आहे. राजधानी पणजीत सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आता कुठे पणजीत ५० इंच पावसाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरी ११० इंच पाऊस पडणे अपेक्षित होते, परंतु केवळ ७७.१६ इंचच पाऊस पडला असून राज्यात ३०.५ टक्के पावसाचा तुटवडा कायम आहे.
राज्यात पावसाचा जोर मंदावला असून पुढील आठवडाभर म्हणजेच चतुर्थी दरम्यानही राज्यात तुरळक ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने या कालावधीत पाऊस कमी असावा अशी सर्वांचीच ईच्छा असते. त्यानुसार यंदा चतुर्थी कालावधीत पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
पाऊस मंदावल्याने उष्मा वाढला
राज्यात पावसाचा जोर मंदावल्याने उष्मा वाढलेला आहे. दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत आहे. ऐन पावसाळ्यात घामाच्या धारा लागत आहेत. पंखा, एससी शिवाय राहणे कठीण होत आहे. आज कमाल ३२.४ अंश सेल्सिअस, तर किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. कमाल तापमानात २.४ अंशांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
वाळपईत सर्वाधिक १०७ इंच पाऊस
राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक १०७ इंच पाऊस वाळपई आणि धारबांदोडा येथे नोंदविण्यात आला आहे तर सर्वात कमी ५० इंच पाऊस हा पणजीत नोंदविण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.