गोव्यातील ‘त्या’ पोलिसांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar), पोलिस महासंचालक आय. डी. शुक्ला यांनी श्रद्धांजली वाहिली.
Police
PoliceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केपे: सुरावली येथे रात्री नाकाबंदीवेळी गस्त घालणाऱ्या दोघा पोलिस शिपायांना धडक दिल्याप्रकरणी क्रेग रॉड्रिगीस यास कोलवा पोलिसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी सुसाट गाडी हाकून थेट गस्त घालणाऱ्या विश्वास देईकर(आकामळ) व शैलेश गावकर (घोडके बाळ्ळी) या दोघा पोलिस शिपायांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या दोघांच्या मृतदेहावर काल शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. हे दोघेही पोलिस (Police) शिपाई एकमेकांच्या शेजारील गावचे असल्याने या आकामळ व घोडके बाळी गावांवर शोककळा पसरली होती. (Police Funeral in Goa Latest News)

Police
म्हापशात खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच

यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar), पोलिस महासंचालक आय. डी. शुक्ला, उपमहासंचालक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटियाल अधीक्षक दिनराज गोवेकर, उपअधीक्षक संतोष देसाई तसेच मोठ्या संख्येने पोलिस कर्मचाऱ्यांनी हजर राहून दोघांनाही श्रद्धांजली वाहिली.

विश्वास देईकर हे आई वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. तसेच त्यांना दोन लहान मुली असून पहिली पाच, तर दुसरी तीन वर्षांची आहे. या कुटुंबावर कमावती व्यक्ती अचानकपणे नाहीशी झाल्याने दुःखाचे सावट पसरले आहे. शैलेश गावकर यांचे दहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते व त्यांची पत्नी आठ महिन्यांची गरोदर असल्याने लोक हळहळ व्यक्त करीत होते. अचानकपणे आलेल्या संकटाने दोन्ही कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला आहे.

पोलिस महासंचालक आय. डी. शुक्ला यांनी पोलिसांवर अशी अनेक संकटे येतात व आपल्या जीवाची पर्वा न करता सामना करतात असे सांगितले. या अपघाताला कारणीभूत चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक मदत...

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सरकारतर्फे प्रत्येकी तीस लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच त्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांत सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिस खात्यातर्फे आर्थिक मदत मिळणार असल्याने सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत ही मदत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज आमच्यामधून आमचे दोन चांगले पोलिस कर्मचारी गेले आहेत, अशी प्रतिक्रिया कवळेकर यांनी व्यक्त केली.

Police
'तृणमूलमध्ये प्रवेश करणं माझी मोठी चूक'

22 तोफांची सलामी...

विश्वास देईकर व शैलेश गावकर यांना पोलिसांनी 22 तोफांची सलामी दिली व मानवंदना देऊन सरकारी इतमामात अंतिम संस्कार केले. यावेळी गोवा (Goa) राखीव दलाच्या पोलिसांनी व गोवा पोलिसांनी आपल्या सहकार्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तसेच आकामळ व घोडके गावातील लोकांनी मोठ्या संख्येने अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com