पणजी : तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आलेक्स रेजिनाल्ड यांनी आपला माफीनामा मतदारांसमोर मांडला आहे. आपण आपल्या मतदार आणि समर्थकांना विचारात न घेत तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. मात्र ती आपली चूक होती. पुन्हा अशी चूक आपल्याकडून होणार नाही, मला माफ करा, अशा शब्दात रेजिनाल्ड यांनी आपला माफीनामा सादर केला आहे. (Goa Election 2022: Aleixo Reginald Lawrence lives TMC)
माझे मतदार आणि लोकांना न विचारता घाईघाईने तृणमुल पक्षात (TMC) जाण्याची एकदा मी चूक केली. मात्र आता पुन्हा तशी चूक करणार नाही. पुढे काय करायचे ते मी लोकांना विचारूनच ठरवेन, असे रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी रविवारी रात्री उशिरा स्पष्ट केले. ते म्हणाले, मी तृणमुल मध्ये माझ्या लोकांचे चांगले व्हावे या एकाच उद्देशाने गेलो होतो. पण लोकांना तो निर्णय आवडला नाही. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा लोक म्हणत होते तुमच्यामुळे मत विभागणी होणार. यामुळेच मी तृणमूलचा राजीनामा दिला. माझ्या चुकीच्या निर्णयामुळे जे कोण दुखावले आहेत त्यांची मी क्षमा मागतो असे रेजिनाल्ड (Reginald Lawrence) म्हणाले
दरम्यान रेजिनाल्ड यांच्या जाण्याने काहीही फरक पडणार नसल्याचं तृणमूलने स्पष्ट केलं आहे. तृणमूलच्या गोवा प्रभारी महूआ मोईत्रा यांनी रेजिनाल्ड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रेजिनाल्ड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना तृणमूलकडून शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी राजीनामानाट्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रेजिनाल्ड काँग्रेसमध्ये (Congress) जाण्याची चर्चा सध्या सुरु आहे.
आलेक्स यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी 20 डिसेंबर रोजी दिला कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा
21 डिसेंबर रोजी तृणमूल कॉंग्रेस पक्षात ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत प्रवेश
पक्ष प्रवेशावेळी तृणमूल कॉंग्रेस हाच पक्ष विश्वासार्ह असल्याचे केले होते विधान
राजीनामा दिल्यानंतर 27 रोजी कुडतरी मतदारसंघातील मतदार झाले नाराज
16 जानेवारीला आलेक्स यांनी दिला तृणमूल कॉंग्रेसला राजीनामा
रेजिनाल्ड आता कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.