Fuel Buddy in Goa: गोव्यात आता घरपोच मिळणार इंधन; 'फुएलबडी'चे आगमन

Fuel Buddy चा वापर करून जास्तीत जास्त 20 लिटर इंधन मागवता येणार आहे.
Fuel Buddy in Goa
Fuel Buddy in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा सरकारने घरपोच इंधन सेवा वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांच्या उपस्थितीत या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. फुएलबडी (Fuel Buddy) ही देशातील सर्वात मोठी घरपोच इंधन सेवा पुरवणारी कंपनी आहे. गोव्यात देखील आता ही कंपनी आपली सेवा पुरवणार आहे. फुएलबडी देशातील 120 पेक्षा अधिक शहरांत सेवा पुरवत असून, कपंनीने आजवर 8 कोटी लिटर इंधन वितरित केल्याचा दावा केला आहे.

Fuel Buddy in Goa
FDA Goa: अन्न व औषध प्रशासनाची दिवाळीपूर्वी छापेमारी; हजारो किलो खवा, पराठा, फरसाण, मिठाई जप्त

गोव्यातील मत्स्य व्यवसाय, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रहिवासी सोसायट्या आणि उद्योगांना घरोघरी इंधन पुरवणार असल्याचे फुएलबडी कंपनीचे म्हटले आहे. Fuel Buddy अॅपवरून ग्राहक थेट इंधन ऑर्डर करू शकतात. जास्तीत जास्त 20 लिटर इंधन मागवता येणार आहे. FuelBuddyचे अॅप उपलब्ध असून, ऑर्डर दिल्यानंतर 3 ते 4 तासांत डिलिव्हरी दिली जाऊ शकते.

Fuel Buddy in Goa
Goa Rain: ढगफुटीला कारण वाढते तापमान!

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घरपोच इंधन सेवेचा शुभारंभ करताना ही सेवा क्रांतिकारी असल्याचे म्हटले आहे. “अशा स्टार्टअप्समुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न लवकरच सिद्ध होईल. घरपोच इंधन सेवेची संकल्पना क्रांतिकारी आहे. FuelBuddy सारखे अॅप्स व्यवसायांना अधिक उत्पादकता वाढविणास मदत करेल.”

Fuel Buddy in Goa
Goa News: '52' कोटी खर्च करुन उभारलेले हॉस्पिटल सध्या मोकाट गुरांचा आसरा

"गोव्यासारख्या राज्यात पर्यटन आणि आदरातिथ्य केंद्रस्थानी आहे. कॅफे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 24X7 चालू ठेवली जातात, त्यामुळे येथे इंधनाची आवश्यकता कायम भासते. गोव्यात सेवेचा शुभारंभ करताना आम्हाला आनंद होत आहे. गोव्यात इंधन चोरी, भेसळमुक्त इंधन आणि पारदर्शक सेवा द्यायची आहे." असे FuelBuddy चे व्यवस्थापकीय संचालक गौतम मल्होत्रा ​​म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com