फळ व मासे विक्रेते अडकणार कायद्याच्या कचाट्यात

किरकोळ मासे विक्री करणार्‍यांना तसेच फळविक्रेत्यांना उद्यापासून पोलिस व मुरगाव पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असून अतिशोक्ती केल्यास आता कायद्याच्या कचाट्याला सामोरे जावे लागणार आहे.
vasco : मासळी मार्केट संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत उपस्थित वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, नगराध्यक्ष दामोदर कासकर, मामलेदार धीरेन बाणावलीकर, मुख्याधिकारी जयंत तारी व इतर.
vasco : मासळी मार्केट संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत उपस्थित वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, नगराध्यक्ष दामोदर कासकर, मामलेदार धीरेन बाणावलीकर, मुख्याधिकारी जयंत तारी व इतर.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: वास्को खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेते तसेच मोक्याच्या ठिकाणी शहरात तसेच इतर भागात किरकोळ मासे विक्री करणार्‍यांना तसेच फळविक्रेत्यांना उद्यापासून पोलिस व मुरगाव पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असून अतिशोक्ती केल्यास आता कायद्याच्या कचाट्याला सामोरे जावे लागणार आहे.पोलिसांना बेकायदेशीर गाडे, रस्ता अडवून बसणाऱ्या विरुद्ध कायदा हातात घेण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी मार्फत सोडण्यात आला.

vasco : मासळी मार्केट संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत उपस्थित वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, नगराध्यक्ष दामोदर कासकर, मामलेदार धीरेन बाणावलीकर, मुख्याधिकारी जयंत तारी व इतर.
गिरीश चोडणकरांचा 'मुख्यमंत्र्यांना' टोला

वास्कोच्या नवीन मासळी मार्केट हा सद्या चर्चेचा विषय ठरला असून सदर नविन मासळी मार्केट बांधण्याच्या कामाला आडकाठी येत आहे.कित्येकवेळा बैठका घेऊन सुद्धा या मासळी मार्केटचा प्रश्न सुटून सुटेना.दरम्यान यावर उपाययोजना काढण्यासाठी आज वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावून मासळी मार्केट मधील मासे विक्रेत्या महिलांच्या मागणीनुसार रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर तसेच घाऊक मासळी विक्रेत्यांवर उद्यापासून कायद्यानुसार कारवाई करण्याचे फर्मान सोडले आहे. येथील मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांनी आधी वास्को, खारीवाडा भागात घाऊक मासे विक्री करणाऱ्या मच्छिमार व्यावसायिकावर तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी बसून व्यवसाय करणार्‍या परप्रांतीय मासे विक्रेत्या महिलांच्या मासळी विक्रीवर बंदी आणा, त्यानंतरच नवीन मासळी मार्केटच्या बांधकामास हात घाला. अन्यथा नवीन मासळी मार्केटच्या बांधकामास विरोध करणार असल्याचा इशारा वास्को मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांनी दिला होता. त्यानुसार वास्कोचे मासळी मार्केट होणार की याविषयी साशंकता निर्माण झाली होती.

vasco : मासळी मार्केट संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत उपस्थित वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, नगराध्यक्ष दामोदर कासकर, मामलेदार धीरेन बाणावलीकर, मुख्याधिकारी जयंत तारी व इतर.
...अखेर 'भूमिपुत्र' विधेयकाविरोधातील उपोषण मागे

दरम्यान मासे विक्रेत्या महिलांच्या या इशाराला अनुसरून वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून यावर विचार विनिमय केला. या बैठकीस उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, मुख्य अधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर, मामलेदार धिरेन बाणावलीकर तसेच उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले, नगरसेवक दीपक नाईक, फेड्रिक हेन्रीक्स, दिलीप बोरकर, अमेय चोपडेकर, यतीन कामुर्लेकर तसेच पोलीस, वाहतूक पोलीस, पालिका अभियंता इत्यादी उपस्थित होते. या बैठकीत नवीन मासळी मार्केट बांधकामास येणाऱ्या अडचणीवर विचार विनिमय करण्यात आला. जोपर्यंत घाऊक मासळी विक्रेत्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मासळी मार्केट सोडणार नाही, असा इशारा दिल्याने घाऊक मासळी मार्केट विक्रेत्यावर उद्यापासून कारवाईचा बडगा उचलण्यात यावा असे फर्मान उपजिल्हाधिकारी गावस यांनी सोडला. पालिकेला ऐकत नसल्याने पोलिस कारवाई कायद्यानुसार करावी असे फर्मान सोडले. त्यानुसार उद्यापासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस या घाऊक मासळी विक्रेत्यांची तसेच मोक्याच्या ठिकाणी बसणाऱ्यांची समजूत काढून त्यांना व्यवसाय बंद करण्यास भाग पाडणार. अन्यथा कलम ३४ अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश उपजिल्हाधिकारी गावस यांनी पोलीसांना दिला आहे. त्यानुसार उद्यापासून खारीवाडा येथील घाऊक मासे विक्रेते तसेच शहरात इतर मोक्याच्या ठिकाणी बसणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. हा कायदा लावताना सगळ्यांनाच लावावा असा आदेश उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी . त्यानुसार वास्को, बायणा, मांगुरहिल, नवेवाडे, वाडे, चिखली भागात या पालिका क्षेत्रातील अतिक्रमणावर कडक कारवाई होणार आहे.

vasco : मासळी मार्केट संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत उपस्थित वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, नगराध्यक्ष दामोदर कासकर, मामलेदार धीरेन बाणावलीकर, मुख्याधिकारी जयंत तारी व इतर.
राज्यात लोकशाही उत्सवातंर्गत 3 संसदेचे आयोजन: मुख्यमंत्री

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले की नवीन मासळी मार्केटचे बांधकामास येत्या तीन-चार दिवसात सुरू करण्यात येणार असून मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्यां महिलांच्या मागणीनुसार या कामास आडकाठी येणारी सर्व अतिक्रमणे दूर करून नवीन मासळी मार्केटचा कामास सुरुवात करण्यात येईल असे ते म्हणाले. नगरसेवक यतिन कामूर्लेकर यांनी गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहीलेला मासळी मार्केटचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर असून याविषयी उपाय योजना आखण्यासाठी आजची बैठक महत्वाची होती.यावर आमदार कार्लुस आल्मेदा, उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस यांनी पोलीसांना व इतर संबंधित अधिकारी वर्गाला आदेश दिले आहेत.त्यानुसार बेकायदेशीर गाडे व इतर अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल व त्यांना बांधण्यात आलेल्या नविन शेडमध्ये स्थलांतरित करण्यात येईल.तसेच नविन मासळी मार्केट बांधकामास सुरुवात केली जाईल असे ते शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com