फ्रेंच अभिनेत्री मरियान बोर्गो (French actor Marianne Borgo) यांनी त्यांना गोव्यातील त्यांच्यात घरात ओलिस ठेवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या घराचा पाणी आणि वीज पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
मालमत्ता वादातून बोर्गो यांची अडवणूक करून त्यांना त्रास दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जगभरात देशाची पर्यटन पूरक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना गोव्यात अशी घटना घडत असल्याने त्या निराश झाल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(French Actor Alleges Held Hostage In Goa Home)
काय म्हणाल्या मरियान बोर्गो?
'कळंगुट येथील माझ्या बंगल्यात मी राहत आहे. पण बंगल्याचे पूर्वीचे मालक त्यांच्या विधवा पत्नी मागील काही दिवसांपासून बंगल्याच्या गेटवर निदर्शेने करत आहे. मागील काही दिवसांपासून मला याठिकाणी ओलिस ठेवले आहे.'
'माझ्या मालमत्तेवर देखील दावा सांगितला जात आहे. त्यातून माझ्या घराचा वीज व पाणी पुरवठा बंद केला आहे. मागील काही दिवसांपासून मी अंधारात राहत आहे. पाणी नसल्याने आंघोळ नाही याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.' असे बोर्गो यांनी म्हटले आहे.
अशाप्रकारच्या देशाची संकल्पना पंतप्रधान मोदींची नाही. मोदी मागील अनेक दिवसांपासून जगभरात देशाची पर्यटन पूरक देशी अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अशा प्रकारच्या घटनांनी मला पूर्णपणे निराश केले आहे.
प्रकरण न्यायालयात गेल्याने स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असे बार्गो म्हणाल्या. बार्गो यांनी 2008 साली कळंगुट येथील हा बंगला वकिल फ्रान्सिस साऊसो यांच्याकडून खरेदी केला. पण, साऊसो यांचे कोरोना काळात निधन झाले आणि तेव्हापासून बार्गो विविध समस्यांचा सामना करत आहेत.
मरियान बोर्गो या प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री आहेत. त्यांनी टीव्ही, चित्रपट यासह विविध नाटकांमध्ये काम केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.