Watch Video: 'ती' वेदनेने विव्हळत राहिली तरी... दलित महिलेला अमानुष मारहाण, सत्यता काय?

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Watch Video
Watch VideoDainik Gomantak

दलित महिलेला पुरुषांकडून काठीने अमानुषपणे मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दलित महिलेने नदीत आंघोळ करून पाणी दूषित आणि अपवित्र केल्यामुळे तिला मारहाण केली असा दावा केला जात आहे. हिंदू लोकांनी दलित महिलेला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर टीका केली आहे. दरम्यान या व्हिडिओची सत्यता देखील काही संकेतस्थळांनी पडताळून पाहिली आहे.

Watch Video
Uttar Pradesh: धक्कादायक! फेसबुकवर तरुणाने केले आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीम, मग पुढे झाले असे काही...

महिलेला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ जुलै 2021 मधील असून, घटनेचा संदर्भ पूर्णपणे वेगळा असल्याचा दावा फॅक्टली या सत्यता पडताळणी करणाऱ्या संकेस्तस्थळाने केला आहे. व्हायरल पोस्टमध्ये आरोप केल्यानुसार या घटनेचा जातीय भेदभावाशी काहीही संबध नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Watch Video
Kozhikode Flight: भर हवेत विमान इंजिनमध्ये लागली आग, अबुधाबीहून भारतात येणारी फ्लाईट माघारी

दावा आणि सत्य काय?

धार जिल्ह्यातील पिपलवा गावातील ही घटना आहे. आदिवासी समाजातील दोन बहिणींनी मामाच्या मुलांशी फोनवर बोलल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. जुलै 2021 मध्ये घडलेल्या या घटनेचा जातीय भेदभाव याच्याशी काहीही संबध नाही. असे फॅक्टलीने आपल्या बातमीत म्हटले आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.

Watch Video
Terror Threat In Mumbai: मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIAला मेल, सर्वत्र अलर्ट जारी

काही लोकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न केला असून, अनेकांनी महिलेने धर्मांतर करावे असाही सल्ला दिला आहे. अनेकांनी तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना टॅग करून हा संबधित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या मुली 19 आणि 20 वर्षांच्या असून, सुरुवातीला त्यांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. अखेरीस तांडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला व 26 जून 2021 रोजी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com