G20 Summit Goa 2023: हवामान बदलाबरोबर प्राण्यांचे आरोग्यही महत्त्वाचे!

केंद्रीय मंत्री रूपाला : लसीकरणासाठी केंद्र घेणार पुढाकार; ग्लोबल साऊथ अधिक असुरक्षित
Union Minister Parshottam Rupala  In G20 Summit Goa 2023
Union Minister Parshottam Rupala In G20 Summit Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

G20 Summit Goa 2023: मानव आणि प्राणी हे संलग्न असल्याने हवामान बदलाचा विचार करताना प्राण्यांचे आरोग्यही महत्त्वाचे आहे.

यासाठी जी-20 सदस्य आणि जागतिक संघटनांनी संयुक्तपणे काम करावे, असे आवाहन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी केले. पाळीव प्राण्यांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जी-20 आरोग्य कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीदरम्यान हवामान बदल आणि आरोग्यविषयक आव्हानांचा सामना: एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या विषयावरील उदघाटनपर सत्रात ते बोलत होते. आशियाई विकास बँक आणि आरोग्य व  कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Union Minister Parshottam Rupala  In G20 Summit Goa 2023
Ponda - Sanquelim Municipal Council Election 2023: 30 जणांची माघार, 74 उमेदवार रिंगणात; भाजपची यशस्वी रणनीती

भारत जगाचा औषधनिर्माता

भारताचे जी- 20 शेर्पा अमिताभ कांत म्हणाले, हवामान बदल, आरोग्यसेवा आणि दारिद्र्य यासारख्या विविध आव्हानांचा  परस्परांशी संबंध आहे. कोरोना महामारीने आरोग्य आणि हवामान बदल हे विषय कसे एकमेकांमध्‍ये गुंतले आहेत, हे दाखवून दिले.

संसर्गजन्य रोग आणि संसाधनांच्या मर्यादांमुळे ‘ग्लोबल साऊथ’ अधिक असुरक्षित आहे, असे ते म्हणाले. भारताने आरोग्य सेवेत लक्षणीय प्रगती केली आहे आणि आता भारत संपूर्ण जगाचा औषधनिर्माता बनला आहे, असे त्यांनी नमूद केले.  

Union Minister Parshottam Rupala  In G20 Summit Goa 2023
Goa Weather Updates : हवामान विभागाचा इशारा; पुढील दोन दिवस असा असणार तापमानाचा पारा

प्राणीजन्य आजारांबाबत दक्ष रहा!

रूपाला म्हणाले की, प्राणीजन्य आजारांच्या बाबतीत दक्ष राहून या आजारांमुळे आरोग्य क्षेत्रात आपत्कालीन स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

प्रादेशिक आजार फैलावण्यावर नियंत्रण ठेवले जावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा आजारांचा पशुधनावर, आर्थिक उत्पादनावर आणि मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com