फोंडा पालिका क्षेत्रातील विविध विकासकामे मार्गी लावताना सर्वांना सोबत घेऊनच ही कामे करण्यात येत आहेत. गेला बराच काळ रखडलेल्या फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता होती.
त्यासाठी फोंडा पालिकेतर्फे कार्यवाही करताना सर्व नगरसेवकांचे तसेच कृषिमंत्री रवी नाईक व इतरांचे सहकार्य मिळाले, त्यामुळेच मुक्तिधामाचे काम मार्गी लागू शकले, असे फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सांगितले.
फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामाला आज (रविवारी) प्रारंभ झाला. नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, नगरसेवक प्रदीप नाईक, शांताराम कोलवेकर, आनंद नाईक, विश्वनाथ दळवी, चंद्रकला नाईक तसेच फोंडा पालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
रितेश नाईक म्हणाले, फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीच्या कामासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
मास्टरप्लॅनची कार्यवाही!
फोंड्याचा मास्टरप्लॅन तयार होत असून या मास्टरप्लॅनचे सादरीकरण फोंडा पालिकेत करण्यात आले होते, आता या मास्टरप्लॅनमध्ये सूचना, हरकती मागवण्यात येत असून नवीन सर्व सुविधांनी युक्त मास्टरप्लॅन लवकरच दुसऱ्यांदा आपल्याला संबंधित एजन्सीकडून दाखवण्यात येणार आहे, त्यानंतर तो खुला करण्यात येईल व नंतर मास्टरप्लॅनची कार्यवाही होईल, असे रितेश नाईक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.