Goa Electricity: सांताक्रुझ परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

जुने ट्रान्स्फॉर्मर व फिडर वारंवार नादुरुस्त
Electricity Connection
Electricity Connection Dainik Gomantak

Goa Electricity: गेल्या काही दिवसांपासून सांताक्रुझ परिसरात रात्रीदिवसा विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक वर्षापासूनची या परिसरातील वीज यंत्रसामग्री वारंवार नादुरुस्त होत असतानाही ती बदलण्यात येत नाही.

दरवर्षी हा प्रकार सुरू असूनही या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडून त्यावर उपाय केले जात नाही अशी संतप्त प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे. या परिसरात वाढलेल्या बांधकामामुळे हे जुने ट्रान्सफॉर्मर व फिडर नादुरुस्त होत आहेत.

Electricity Connection
DGP म्हणतात ट्रेनिंग सेंटर स्वच्छ; मग दिल्लीत गोव्याचे प्रशिक्षणार्थी पोलिस कसे आजारी पडले?

बांबोळी वीज विभागाशी संपर्क साधला असता खात्याने ते बदलण्याबाबत प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगून कानावर हात ठेवत आहेत.

गेल्या दोन आठवड्यापासून मध्यरात्रीनंतर वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. सुमारे दोन - तीन तास ही वीज गायब होत असल्याने रात्रीच्यावेळी लोकांना या उन्ह्याळ्यात झोप घेणेही कठीण होऊन बसत आहे.

रात्रीच्यावेळी सांताक्रुझ येथील वीज केंद्राशी संपर्क साधला असता फोन बंद असतात किंवा कोणी ते उचलत नाहीत. हेच प्रकार दिवसाचे होत आहे.

Electricity Connection
Jit Arolkar : जमीन हडपप्रकरणी आमदार आरोलकर यांच्याविरुद्ध आयोगासमोर आज सुनावणी

फिडरवर अधिक भार!

या समस्येबाबत लोक बांबोळी वीज विभागात गेले असता त्या कार्यालयात उत्तर देण्यास अधिकारी उपस्थित नसतात. कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात येते. बांबोळी परिसर ते दोना पावल येथील परिसरापर्यंत वेगळी वीज वाहिनी आहे. त्यामुळे या भागातील वीज कधीच जात नाही.

मात्र सांताक्रुझ परिसरासाठी जोडण्यात आलेली वाहिनी वेगळी असून या परिसराला करण्यात येणारा वीजपुरवठा कमी असल्याने फिडरवर अधिक भार येऊन ते वारंवार बंद पडत आहेत. ते बदलण्याची गरज आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रतिनिधीने संपर्क साधला असता सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com