Quepem :श्रेयवादावरून केपेमध्ये आजी,माजी आमदारांत पुन्हा जुंपली!

डांबरीकरणावरून वाद : विकासकामांना फटका बसल्याचा दावा
Qeupem
QeupemGomantak Digital Team

केपे : नवीन सरकार स्थापन होऊन दीड वर्षे होत आले, तरी अद्याप विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्ता आणि माजी आमदार बाबू कवळेकर यांच्यामधील वितुष्ट संपण्याचे नाव घेत नाही. केपेच्या विकासाचे श्रेय कुणाला, याबाबत या आजी-माजी आमदारांत वारंवार खटके उडत असून केपे बाजारातील हॉटमिक्स डांबरीकरणावरून आज पुन्हा एकदा वाद झाला.

मतदारसंघातील विकासकामांवरून कवळेकर आणि डिकॉस्ता यांच्यातील वाद वेळोवेळी उफाळून येत असल्याने याचा फटका केपे मतदारसंघातील लोकांना बसत आहे. आज केपे बाजारात हॉटमिक्स डांबरीकरण प्रारंभावेळी कवळेकर यांनी, हे काम माझ्या कारकिर्दीत मंजूर झाले होते, तसेच मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य लाभले होते, असे सांगितले.

Qeupem
शनिवारी शनिदेवाला तेल का अर्पण केले जाते?

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा विकास झाला. यात पालिका क्षेत्राबरोबर पंचायत क्षेत्रातही कामे केली होती, असे त्यांनी सांगितले. केपे बाजारातील पार्किंग समस्या लक्षात घेऊन बाजारातून गेलेल्या पाण्याच्या कालव्यावर जागा करून पार्किंगची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजकीय मतभेद बाजूला सारून मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार डिकॉस्ता यांना सहकार्य लाभेल, असेही ते म्हणाले.

Qeupem
CM Pramod Sawant : 'G २०' बैठकीत महिला प्रणित स्टार्टअप

विकासकामात कुणीही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नाही, असे डिकॉस्ता म्हणाले.या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची निविदा आपण आमदार झाल्यावर जारी झाली असा दावा आमदार डिकॉस्ता यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, नगरसेवक दयेश नाईक, अमोल काणेकर, दीपाली नाईक, जाकीना डायस आणि मान्यवर उपस्थित होते.

Qeupem
P.Khurana Passes Away : बी टाऊनमधून वाईट बातमी.. आयुष्यमान खुरानाच्या वडिलांचं निधन...

मूलभूत सुविधांची वानवा : डिकॉस्ता

यावेळी डिकॉस्ता यांनी आज जे काम झाले, ते आपल्या कारकिर्दीतील असल्याचा कागदी पुरावा सादर केला. केपे मतदारसंघाचा अजिबात विकास झालेला नाही. बऱ्याच ठिकाणी लोकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. मोरपिर्ला, खोला, बार्से गावांत अद्याप लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. काहींना शौचालयही मिळाले नसल्याने मतदारसंघाचा चौफेर विकास कसा झाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Qeupem
Cheetahs Death: कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त, म्हणाले त्यांना...

चार वर्षांत विकास करून दाखवा : बाबू कवळेकर

आमदार डिकॉस्ता हे मी केलेल्या कामाचे श्रेय घेत असून माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या कामांचा प्रारंभ करून फक्त नारळ फोडण्याचे काम करत असल्याचे बाबू कवळेकर म्हणाले. मी हे काम २०२१ साली मंजूर करून घेतले होते, असे सांगत त्याचा पुरावाही त्यांनी सादर केला. डिकॉस्ता यांनी उर्वरित चार वर्षांच्या कार्यकाळात लोकांची कामे करून दाखवावीत. या कामासाठी माझे सदैव सहकार्य असेल. विकासकामाच्या आड मी येणार नाही. कारण मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय आहे, असेही बाबू कवळेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com