P. Khurana Passes Away: बी टाऊनमधून वाईट बातमी.. आयुष्यमान खुरानाच्या वडिलांचं निधन...

अभिनेता आयुष्यमान खुरानाच्या वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं आहे.
P.Khurana Passes Away
P.Khurana Passes AwayDainik Gomantak

P. Khurana Passes Away: अभिनेता आयुष्मान खुरानाला मोठा झटका बसला आहे. त्यांचे वडील आणि प्रसिद्ध ज्योतिषी पी खुराना यांचे निधन झाले आहे. 

पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते.पी खुराना हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना वाचवता आले नाही.

खुराना यांच्या निधनाची अधिकृत माहिती त्यांच्या कुटूंबाने एक नोट शेअर करत दिली आहे. त्यात लिहिले होते, "आम्ही दु:खाने कळवत आहोत की आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील, ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी 10:30 वाजता मोहाली येथे दीर्घकाळ असाध्य आजारामुळे निधन झाले. या दरम्यान तुमच्या सर्व प्रार्थना आणि समर्थनासाठी आम्ही ऋणी आहोत. ."

पी खुराना हे ज्योतिषाच्या क्षेत्रातील योगदानासाठी उत्तर भारतात प्रसिद्ध होते. मूळचे चंदीगड, पंजाबचे, त्यांनी या विषयावरील त्यांच्या ज्ञानावर आधारित पुस्तके देखील लिहिली

P.Khurana Passes Away
Sameer Wankhede Controversy :आर्यन खान प्रकरणात CBI शाहरुखची मॅनेजर 'पूजा ददलानी'चा जबाब नोंदवणार

आपल्या वडिलांबद्दल बोलताना आयुष्मानने 2020 मध्ये हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की तो त्याच्या वडिलांच्या शिकवणीवर विश्वास ठेवतो, ज्याचे त्याने मनापासून पालन केले. “माझा ज्योतिषावर विश्वास नाही, पण माझे वडील माझे जीवन प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. ते नेहमी मला 'बेटा पब्लिक की नब्ज पकडो' (लोकांची नाडी पकड) म्हणत असत आणि मी तेच केले,”.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com