Sameer Amunekar
गोवा हे पर्यटकांचं आवडतं ठिकाणं असलं तरी प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
हॉटेल आणि कॅसिनोमध्ये ओळखपत्र गरजेचे असते. गाडी भाड्याने घेताना ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असते.
टू-व्हीलर किंवा कार भाड्याने घेताना वैध परवाना आणि हेल्मेट वापरा. ट्रॅफिक नियमांचे पालन करा, अन्यथा दंड भरावा लागू शकतो.
केवळ अधिकृत स्विमिंग झोनमध्ये पोहण्याचा आनंद घ्यावा. रेड फ्लॅग असलेल्या भागात समुद्रात उतरणे टाळा. स्थानिक गाईडचा सल्ला घ्या.
रात्री अपरिचित भागात फिरणे टाळा. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित ठिकाणीच वापरा.
मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर योग्य पोशाख परिधान करा. सार्वजनिक ठिकाणी वाद विवाद आणि अनुचित वर्तन टाळा.