इंदिरानिष्ठ आयरीन बार्रुश यांच्यावर आज अंत्यसंस्कार

कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष आयरीन बार्रुश यांचे निधन
आयरीन बार्रुश
आयरीन बार्रुशDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: जुन्या काळातील निष्ठावान काँग्रेस (Congress) कार्यकर्त्या म्हणून परिचित असलेल्या काँग्रेसच्या माजी गोवा (Goa) प्रदेशाध्यक्ष आयरीन बार्रुश (91) (Irene Barros) यांचे काल रविवारी बेताळभाटी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्यामागे समाजसेवक पुत्र दिनार बार्रुश व दोन कन्या असा परिवार आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जवळ असलेल्या बार्रुश याना इंदिरानिष्ठ म्हणून ओळखले जायचे. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर गोव्यातील काँग्रेस नेते अर्स काँग्रेस बरोबर गेले. त्यावेळी बार्रुश या मात्र इंदिरा काँग्रेस बरोबर राहिल्या होत्या. त्यांच्या या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना गोवा विधानसभेत आमदार (स्वीकृत) म्हणून नेमण्यात आले होते. बार्रुश बेताळभाटी पंचायतीच्या पहिल्या सरपंच होण्याचा सन्मान मिळाला होता. बार्रुश या स्वाभिमानी गोवेकर होत्या. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये, यासाठी जे आंदोलन झाले त्यात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते.

आयरीन बार्रुश
Goa Murder Case: पोलिसांकडून लपवाछपवी, पुरावेही नष्ट

आज अंत्यसंस्कार

काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष आयरीन बार्रुश यांचा मृतदेह काँग्रेस झेंड्याने लपेटून त्यांना मानवंदना देण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. उद्या मंगळवारी सकाळी 9 वाजता बेतालभाटी येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा बेताळभाटी चर्चकडे निघणार आहे.

कोकणी भाषा मंडळाची श्रद्धांजली

आयरीन लॉरेन्स बार्रुश यांच्या निधनावर कोकणी भाषा मंडळाने दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कोकणी शाळांना होत असलेल्या विरोधा विरुद्ध लढण्यासाठी त्या कोकणी चळवळीत उतरल्या. जनमत कौल चळवळीत स्व. बार्रुश यांचा मोलाचा सहभाग होता. बेताळभाटी येथील सरकारी शाळेत कोकणी प्राथमिक शाळा सुरु करण्यास त्यांनी पुढाकार घेतला. कोकणीसाठी केलेल्या योगदानाची सदैव आठवण राहिल, असे कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com