Former Congress Chief Girish Chodankar: भाजपची सत्ता असलेली दहा राज्ये त्यांच्यासाठी एटीएम मशिन्स आहेत का, असा सवाल काँग्रेसचे माजी प्रदेशअध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्तीसगड आणि कर्नाटक हे काँग्रेससाठी एटीएम मशीन्स बनल्याचे वक्तव्य केले होते. यावर चोडणकर यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत चोडणकर यांनी ट्विट केले.
"इंडिया आघाडीचा प्रमोद सावंत आणि त्यांचे पक्षाच्या सहकाऱ्यानी धसका घेतला असून त्यातूनच ही निराशा व्यक्त केली जात आहे. आपल्या निहित स्वार्थासाठी इंडिया आघाडी फोडण्यासाठी कोणत्याही थराला जातील."
"लोकसभा निवडणुकांवर नजर ठेवून, भाजपशासित राज्यांनी योजनांचा मोठा गाजावाजा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ते विरोधी पक्षांना लक्ष्य करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाची जनता किती हताश झाली आहे हे माहित आहे आणि त्यामुळे कोणत्याही डावपेचांना बळी पडणार नाही," असे चोडणकर म्हणाले.
"निवडणुकीच्या वेळी आपली सत्ता जिथे आहे त्या राज्यांचा एटीएम म्हणून कसा वापर करावा हे भाजपला चांगल्या प्रकारे माहीत आहे. मला आशा आहे की सावंत आता स्वतःच्या एटीएमवर स्पष्टीकरण देतील, असे म्हणत एक शिक्षकी पेशातील व्यक्ती कलेक्शन एजंट बनली होती का हेही जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत" असे त्यांनी म्हटले आहे.
"कर्नाटकात निवडणूक झाली त्यावेळीं गोव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जो प्रकल्प सुरू करायचा होता, त्यासाठी एका बोलीदाराला कोट्यवधी रुपये देण्याचे कसे सांगण्यात आले, हे सर्वांनाच माहीत आहे."
"निवडणुकीच्या खर्चासाठी कॅसिनो, कंत्राटदार, व्यावसायिक, बिल्डर आणि हॉटेलवाले यांची कशी पिळवणूक झाली हे लोकांनाही माहीत आहे,” असे चोडणकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.