Panaji Smart City Work: घ्या! पणजीत आणखी एक ट्रक रुतला; 'स्मार्ट सिटी'च्या निकृष्ट कामाचं नवं उदाहरण

गोव्यात सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहे. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदलेले दिसत आहेत.
Smart City Work
Smart City WorkPramod Yadav
Published on
Updated on

Panaji Smart City Work: गोव्यात सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहे. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदलेले दिसत आहेत. यामध्ये गेल्या दोन महिन्यात मालवाहतूक ट्रक रस्त्यात रुतण्याचे प्रकार समोर आले.

आजही अशीच एक घटना घडली आहे. पणजीतील सांतीनेज परिसरातील शीतल हॉटेलजवळ एक ट्रक रस्त्यात रुतून पूर्णपणे कलंडल्याने पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Smart City Work
Sanquelim Municipal Council Election 2023: रुसवे-फुगवे, मनधरणी हे भाजपसमोर आव्हान; साखळीत मुख्यमंत्र्यांचा प्रचारावर जोर

शीतल हॉटेल ते काकुलो मॉल या रस्त्यावरील काम सुरू असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक बंद होती. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू होती. दरम्यान, आज सकाळी एका ट्रकचे चाक रस्त्यात रुतले आणि ट्रक कलंडला. यामुळे तिथे वाहतूक कोंडी झाली आहे.

एकतर सांतीनेजमधील या भागात हॉटेल्स आणि कॉर्पोरेट कार्यालये असल्यामुळे या रस्त्यावर रहदारीचे प्रमाण जास्त असते.

अशावेळी सकाळी कामाच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. माहितीनुसार, आता या घटनेनंतर एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहेत.

जवळपास महिन्याभरापूर्वी याच परिसरात, शीतल हॉटेलजवळच मालवाहतूक करणारा ट्रक रस्त्यात रुतला होता. त्यामुळे या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

दरम्यान, राज्यात स्मार्ट सिटीची कामे एका बाजूला सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला पणजीवासीय सततच्या खोदकामांमुळे होणाऱ्या धुळीमुळे वाहतूक कोडींमुळे आणि रस्त्यात वाहने खचण्याच्या घटनामुळे वैतागले आहेत.

महानगरपालिका व ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहून आम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये, अशा शब्दांत नागरिक चीड व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com