Mahadai Forest Fire : जंगलांतील आगीमुळे मानवी जीवनावरही होतोय परिणाम

सत्तरीत बागायतदार धास्तावले : गवे, खेती, माकडांचे आक्रमण वाढले
Goa Forest Fire
Goa Forest FireGomantak Digital Team

वाळपई : सत्तरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत म्हादईच्या जंगलांमध्येे मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडल्या होत्या. साट्रे, देरोडे, झाडानी, पाली, चरावणे, वाघेरी डोंगर भाग, चोर्ला, सुर्ला अशा विविध म्हादई क्षेत्रातील जंगलात आगीने पेट घेतला होता. त्यात म्हादईचे अस्तित्व जळून नष्ट झाले होते. याचा परिणाम या जंगलांत राहणाऱ्या वन्यप्राण्यांवर झाला असून आधीच वन्यप्राण्यांच्या कचाट्यात सापडलेल्या बागायतदारांना आणखीन समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

गवेरेडे, खेती, माकडे यांचे आक्रमण वाढले आहे. सत्तरी तालुक्यात विविध गावांतील बागायती पिकांत, रस्त्यालगत गवेरेडे फिरताना दिसत आहेत. शेतकरी, बागायतदार वर्ग वन्यप्राण्यांच्या अतिआक्रमणामुळे मेटाकुटीला आलेला असतानाच आता संकट जास्त वाढले आहे. त्यामुळे उत्पन्न हातातून निसटत आहे. रानडुक्कर, गवेरेडे, माकड, खेती पिकांचे नुकसान करतात. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांनी शेती करणे कमी केले आहे.

Goa Forest Fire
Goa Dairy: दूध उत्पादक निवडणार गोवा डेअरीचा अध्यक्ष; मुख्यमंत्र्यांकडून कायदा करण्याची ग्वाही

समतोलपणा गरजेचा

जंगल व मानव यांच्यात समतोलपणा फार गरजेचा आहे. त्यातील एकजरी डगमगला तर विपरित परिणाम होतो. सत्तरीत जंगलांना आगीमुळे वन्यप्राण्यांचे अधिस्थानच नष्ट झाले आहे. आगीमुळे जनावरे पळून गेलीत व आपल्या अस्तित्वासाठी आता लोकवस्तीचा आधार घेत आहेत. आगीत जीवजंतू मरून जातात. त्याचा थेट परिणाम वातावरणावर होतो. ऑक्सिजनचा थर कमी होतो, असे सूर्यकांत गावकर यांनी सांगितले.

Goa Forest Fire
7Kms human chain in Panaji to celebrate Mhadei | Goa News | Gomantak Tv

जंगलातील झाडे नष्ट झाल्यावर त्याचे भयानक परिणाम मानवाला भेडसावणार आहेत. त्यात आता पुराचा धोकाही वाढला आहे. कारण जंगलात झाडे असताना पावसाचे पाणी तिथे स्थिरावते. पण आता झाडे नष्ट झाल्याने पावसाचे पाणी जोराने पायथ्याच्या भागात वाहून येईल व जमिनीची धूपही होऊ शकते. डोंगर कोसळण्याची भीतीही निर्माण झाली आहे. दोन वर्षांअगोदर साट्रे भागातील भला मोठा डोंगर कोसळला होता.

सूर्यकांत गावकर, पर्यावरणप्रेमी, भुईपाल-सत्तरी

Goa Forest Fire
Mapusa Police : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 26 वर्षीय युवकास अटक

आपण जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक कर्तव्य बजाविले पाहिजे. जंगलांचे संवर्धन, संरक्षण गरजेचे आहे. सत्तरीत मानवाने केलेली कृती अत्यंत अशोभनीय आहे. त्यातून आता मानवावर परिणाम दिसून येत आहेत. वन्यप्राणीदेखील आता रस्त्यालगत भटकताना दिसत आहेत. जंगल व मानव यांच्यात इकोलॉजिकल समतोलपणा राखणे गरजेचे आहे.

गौरीश गावस, मासोर्डे-वाळपई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com