Goa Dairy
Goa DairyDainik Gomantak

Goa Dairy: दूध उत्पादक निवडणार गोवा डेअरीचा अध्यक्ष; मुख्यमंत्र्यांकडून कायदा करण्याची ग्वाही

फोंड्यात कृषी महोत्सवाला प्रारंभ
Published on

Goa Dairy: केवळ दूध उत्पादकांच्या अध्यक्षाला गोवा डेअरीचा संचालक निवडण्याचा अधिकार न देता गोवा डेअरीशी संबंधित दूध उत्पादकालाही प्रत्यक्ष मतदानात सहभागी करता यावे, यासाठी राज्य सरकार नवीन कायदा करत आहे. भविष्यात दूध संस्थांच्या अध्यक्षांसह दूध उत्पादकांच्या सहभागातून संचालक मंडळ निवडून येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केली.

Goa Dairy
अभिमानास्पद! दोन गोमन्तकीयांचा UK मध्ये डंका ; पती उपमहापौर तर पत्नीकडे शिक्षण विभागाची जबाबदारी

फोंडा येथे कृषी खात्याने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सरपंच संजना नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, कृषी खात्याचे संचालक नेविल अफोन्सो उपस्थित होते.

‘डेअरीच्या कायद्यात बदल करण्याची आमुलाग्र गरज आहे. गोवा डेअरी ही दूध उत्पादकांची डेअरी असून ती त्यांच्याचकडे राहिली पाहिजे. डेअरीच्या संचालक मंडळाची निवड दूध संस्थांच्या अध्यक्षांच्या मतांवर होते, एखाद्या दूध संस्थेचा अध्यक्ष जो वर्षातून एकदा कुणाच्या तरी नावावर गोवा डेअरीला दूध घालतो आणि अध्यक्ष म्हणून मिरवतो, संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाग घेतो आणि मग बोली लावली जाते.

हे बोली लावण्याचे प्रकार गोवा डेअरीच्या मुळावर आले असून असे प्रकार यापुढे होणार नाहीत, त्यासाठी दूध उत्पादकांना प्रत्यक्ष गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहभागी करून घेतले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासंबंधीची सूचनाही प्रशासकांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com