Goa Stray Dogs: परदेशी महिलेचे प्राणीप्रेम बेतले ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर

‘त्या’ श्‍वानप्रेमी परदेशी महिलेबद्दल स्थानिकांतून चीड व्यक्त करण्यात येत आहे.
Goa Starry Dog
Goa Starry DogDainik Gomantak
Published on
Updated on

देवसू-कोरगाव येथे वास्तव्याला असलेल्या एका परदेशी महिलेने प्राणी प्रेमापोटी जवळजवळ गावातील पन्नासेक कुत्रे पाळले आहेत व ती सकाळच्या वेळी या कुत्र्यांना गाडीत घालून देऊळवाडा येथे आणून माळरानात जाणाऱ्या रस्त्यावर सोडते.

Goa Starry Dog
President Draupadi Murmu: राष्ट्रपतींच्या आगमनाने चैतन्य

सोमवारी त्याबाजूने रोज मॉर्निंगवॉकसाठी जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकावर या कुत्र्यांनी हल्ला केला.

यावेळी कुत्र्यांची मालकीण त्या कुत्र्यांना सोडून दूरवर उभी होती. त्यामुळे कुत्र्यांना आवरायला ती लगेच न आल्याने या ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर एकदम चाळीस-पन्नास कुत्रे धावले व एका कुत्र्याने तर त्यांच्या दोन्ही पायांना नखे लावून दुखापत केली.

Goa Starry Dog
President Draupadi Murmu: राष्ट्रपतींकडून आझाद मैदानावरील स्मारकाला भेट; हुतात्म्यांना आदरांजली

स्थानिकांची तंबी

‘त्या’ श्‍वानप्रेमी परदेशी महिलेबद्दल स्थानिकांतून चीड व्यक्त करण्यात येत आहे. त्याठिकाणी जवळपास मुले असती आणि त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला असता तर भयंकर प्रसंग ओढवला असता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी त्या महिलेला पुन्हा या भागात कुत्रे आणता कामा नये म्हणून तंबी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com