Goa BJP: भाजपविरोधात एकवटले पाच पक्ष

Goa BJP: दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेसचे उमेदवार : ‘आरजी’ ही भाजपची ‘बी टीम’; कांगावा जनतेला ठाऊक : माणिकरावांची टीका
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP:

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी 67 टक्के मतांची विभागणी होऊ नये, यासाठी कॉंग्रेसला पाच राजकीय पक्षांची साथ लाभली आहे. हे पक्ष कॉंग्रेससोबत निवडणूक प्रचारातही सक्रिय असतील. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष यांच्यातील राजकीय समन्वयासाठी समिती नेमली जाणार आहे.

आज मिरामार येथील एका हॉटेलमध्ये या पाचही पक्षांच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत कॉंग्रेसच्या उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघांतील उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत या पक्षांनी सक्रिय पाठिंबा देण्यावर एकमत झाले. उद्यापासून समन्वयासाठी आणखी बैठका घेण्याचेही आज रात्री ठरविण्यात आले. या बैठकीपासून रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) आणि तृणमूल कॉंग्रेस हे पक्ष मात्र दूरच राहिले.

या बैठकीत कॉंग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष एम.के. शेख, आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्ता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पाटकर, आमदार वेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, उपाध्यक्ष ॲड. अविनाश भोसले, शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष जितेश कामत आदी सहभागी झाले होते.

Goa Politics
Goa Crime News: सांगेत ‘सिडनी’ची दादागिरी; महिलेला मारहाण

या बैठकीनंतर रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी सांगितले, मतविभागणी होणार नसल्याने कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार जिंकणार, म्हणून इंडिया आघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतविभागणी करून विजय मिळवायचा, हे तंत्र आता चालणार नसल्याचे लक्षात आल्याने भाजपच्या नेत्यांना कापरे भरले आहे.

या भीतीपोटीच त्यांना दक्षिण गोव्यातील उमेदवार निश्चित करता येत नाही. याचमुळे त्यांनी सुचवलेली नावे त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी नाकारली आहेत. कॉंग्रेस जिंकणार, ही जनतेच्या मनातील गोष्ट आहे. जनता इंडिया आघाडीसोबत आहे.

Goa Politics
Ayush Hospital: धारगळच्या भारतीय आयुर्वेद संस्थेत दिवसाला 500 बाह्यरुग्ण

कॉंग्रेस दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच एकाचवेळी करेल. अमूक एकाला उमेदवारी द्या किंवा देऊ नका, अशी सूचना कोणत्याही पक्षाने आजच्या बैठकीत कॉंग्रेसला केलेली नाही. भाजप नेत्यांना दिसतो पराभव विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, भाजपच्या नेत्यांना पराभव दिसू लागल्याने ते दक्षिणेचा उमेदवार ठरविण्यासाठी वेळकाढूपणा करत आहेत.

त्यांना महिलांचा पुळका आलेला नाही. त्यांना खरोखरच महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचे असल्यास त्यांच्याकडे तीन महिला आमदार आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन नारी सन्मान खऱ्या अर्थाने करता येईल. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकणे कठीण झाल्याने तेथे महिलेला उमेदवारी देण्याचे फुकटचे औदार्य भाजपकडून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय व्यूहरचनेची आखणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, आजच्या आघाडीच्या पहिल्या बैठकीत राजकीय व्यूहरचनेविषयी विस्ताराने चर्चा झाली.

भाजपचे भ्रष्ट सरकार जनतेला या देशातून घालवायचे आहे. मतविभागणी होणार नसल्याने कॉंग्रेस जिंकेल, असा जनतेतही आत्मविश्वास निर्माण होणार आहे. तीच गोमंतकीयांची भावना आहे. यापुढे सर्व पक्ष कामांची जबाबदारी वाटून घेतील. एका आवाजात प्रचार करतील. ...म्हणून तवडकरांनी दिला नकार पाटकर म्हणाले की, मुख्यमंत्री आधी 1 लाखांच्या फरकाने भाजप जिंकेल,

असे सांगत होते. नंतर तो आकडा 60 हजारांवर आला, आता ते केवळ जिंकू, असे म्हणत आहेत. यावरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचे दिसून येते. दक्षिण गोव्यातून सभापती रमेश तवडकर आणि आमदार दिगंबर कामत यांना पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com