केळबाय कुर्टीचा माटोळीतील 'वराह अवतार' ठरतोय आकर्षणाचे केंद्र

कुर्टी फोंडा गोवा येथील माटोळी कलाकार विशांत वसंत गावडे यांनी केली सजावट
Kurti Ponda
Kurti Ponda Dainik Gomantak
Published on
Updated on

केळबाय कुर्टी फोंडा येथील माटोळी कलाकार विशांत वसंत गावडे यांच्या घरी गणेश उत्सावानिमित्ताने वराह अवतार रुपी माटोळी सजावट करण्यात आली आहे. कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या माटोळी सजावट स्पर्धेत विशांत गावडे गेली पाच वर्षे या स्पर्धेत सहभागी होत आहे.

('Varaah Avatar' made from 'Matoli' at Kurti Ponda)

Kurti Ponda
गोव्यात ख्रिश्चन-हिंदू परंपरेचा मिलाप, गणेशाची मनोभावे पूजा; 5 दिवस मांसाहाराचाही त्याग

यंदाच्या वर्षी वराह अवतार माटोळी सजावट करण्यामागे एक खास विचार आहे. तो विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक लहानसा प्रयत्न आहे. असे ते म्हणाले. सर्वांना माहीत आहे की वराह अवतार हा भगवान श्री विष्णूचा तिसरा अवतार आहे.

जेव्हा पृथ्वी संकटात होती आणि हिरण्याक्ष या राक्षसाकडून जन कल्याणासाठी पृथ्वीचें रक्षण करणे गरजेचे होते. त्या वेळी भगवान श्री विष्णूनी वराह अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण केले होते. आज तशीच परिस्थिती उद्भवलेली आहे.

Kurti Ponda
Goa: सप्टेंबरमध्ये गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता - IMD

वेगवेगळे राक्षस पृथ्वीला त्रास देत आहेत. पृथ्वीचे भक्षण करीत आहेत. पृथ्वी संतुलन बिघडवत आहे. आज परत जनकल्याणासाठी पृथ्वीचे रक्षण करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आज आपण सर्वांनी मिळून वराह अवताराचा आदर्श घेऊन वेगवेगळे राक्षस जे पृथ्वीची पोखरण करीत आहेत. त्यांच्यापासून पृथ्वीच्या रक्षणासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.

विशांत गावडे यांच्या घरी यंदाच्या या माटोळी सजावटीसाठी 300 जिन्नसांचा समावेश करण्यात आला आहे. ही सजावट करण्यासाठी प्रशांत, चंद्रेश, ओमकार, आदित्य, दक्ष, हर्षा, करुणा व खास व्यक्ती तेजस केरकर यांचा हातभार आहे.

कला व संस्कृती संचालनालयाच्या स्पर्धेत गेली पाच वर्षे सहभागी होवून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली आहे. ही माटोळी सजावट विशांत गावडे यांच्या केळबाय कुर्टी फोंडा येथील निवासस्थानी 4 सप्टेंबरपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com