Goa Fish Market: मासेमारी बंदी, खराब हवामानामुळे मासळी महागली; 'असे' आहेत दर...

गेल्या आठवड्यापासून 50 रुपयांची दरवाढ
Goa Fish Market
Goa Fish MarketDaink Gomantak

Hike in Fish Rates in Goa: पाऊस, खवळलेला समुद्र, मासेमारीला बंदी या कारणांमुळे गोव्यात सध्या मासळीचे दर वाढले आहेत. पणजी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून मासळी दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे.

मॅकरेल आता 250 रुपये किलो आहे तर किंगफिश 300 रुपये किलो आणि कोळंबी (आकारानुसार) 350 ते 400 रुपये किलो आहे. लेडीफिशचे दर 1000 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत, तर पॉम्फ्रेट माशाचा दर 800 रुपये किलो आहे.

Goa Fish Market
Deaths by Drowning in Goa: राज्यात वर्षभरात 36 जणांचा बुडून अंत; जुलै महिन्यात 6 जणांचा मृत्यू

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 13 जुलैपर्यंत दक्षिण महाराष्ट्रापासून ते गोवा किनारपट्टीपर्यंत 40 ते 45 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवला आहे. 13 जुलैपर्यंत ढगाळ हवामानाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या काळात मच्छीमारांना गोव्याच्या किनारपट्टीवर आणि समुद्रात प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, मासेमारीवर बंदी असल्याने यांत्रिकी ट्रॉलर 61 दिवस समुद्रात जाणार नाहीत. मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. पारंपरिक मच्छीमारांनाही यशस्वीपणे मासेमारी करता येत नाही,” असे मत्स्य विक्रेते मंजू नाथ यांनी सांगितले.

Goa Fish Market
गोव्याला जाणाऱ्या बारामतीच्या दोन कारचा अपघात, एकाचा मृत्यू; अजित पवारांच्या फोनमुळे मध्यरात्री मिळाली मदत

“सध्या बाजारात उपलब्ध असलेली मासळी शेजारील राज्यांतून आयात केली जात आहे. तिथेही हवामान आणि खवळलेल्या समुद्रामुळे मासळीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत.

जोपर्यंत तुटवडा निर्माण होत नाही तोपर्यंत दर चढेच राहणार असल्याचे किरकोळ बाजारातील मासळी व्यापारी सांगत आहेत. “मासेमारी बंदी आणि प्रतिकूल हवामानामुळे, किमान आणखी एक महिना तरी दर कमी होणार नाहीत, असे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com