Cutbona Fishing Jetty: कुटबण जेटीवर रोगाचं थैमान, डेंग्यूची लागण होऊन एका मच्छीमार मजुराचा मृत्यू

सध्या कुटबण जेटीवर डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, डायरियासारख्या आजारांची लागण कित्येक मच्छीमार मजुरांना लागली आहे.
Cutbona Fishing Jetty
Cutbona Fishing JettyDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या कुटबण जेटीवर डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, डायरियासारख्या आजारांची लागण कित्येक मच्छीमार मजुरांना लागली आहे. डेंग्युमुळे एका मजुराचे निधन झाले आहे. त्यामुळे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. आज उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कचेरीत आज बैठक संपन्न झाली. यावेळी सोमवारी पाहणी करण्याचे निश्‍चित करण्यात आले. बैठकीला आमदार क्रुझ सिल्वा, केळशीचे सरपंच डिक्सन वाझ, विविध खात्याचे अधिकारी, गोवाकॅनचे रोलंड मार्टीन्स, पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई उपस्थित होते.

दरम्यान, बैठकीत आम्ही तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. शिवाय पुढे आणखी हे आजार वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छतेसाठी उपाय वगैरे विषयावर चर्चा झाली, असे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी सांगितले. संबंधित सर्व खात्यांतील अधिकाऱ्यांना योग्य उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जेटी ही मत्स्यव्यवसाय खात्याच्या अधिकारात आहे. या खात्याने मजुरांची माहिती पंचायतीला देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी या जेटींची संयुक्त पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Cutbona Fishing Jetty
Goa Assembly: संरक्षक भिंतीसाठी पर्यावरण परवान्याची प्रतिक्षा; हळर्णकर यांची माहिती

सिल्वा म्हणाले, बोट मालकांचीसुद्धा मोठी जबाबदारी आहे. त्यांनी सुद्धा या कामी पुढाकार घेऊन पंचायत, मत्सव्यवसाय खात्याला सहकार्य करणे आवश्यक आहे. सरपंच डिक्सन म्हणाले, आम्हांला बोट मालकांकडून त्यांच्याकडे नेमके किती कामगार कामाला आहेत, त्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. येथील समस्या मत्स्यव्यवसाय, आरोग्य, मजूर खाते यांनी संयुक्तपणे काम केले तर गंभीर समस्या सुटू शकेल.

गोवा कॅनचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून येथील जेटीवर ही समस्या उद्‍भवत आहे. आम्ही कित्येकवेळी आवाज उठविला, तरी मत्स्यव्यवसाय खाते किंवा आरोग्य खाते त्याची गंभीर दखल घेत नाही. बाळ्ळी येथील आरोग्य खाते येथील समस्या सोडविण्याइतपत सक्षम नाही. मजुर खात्याने यात लक्ष घातले पाहिजे. पंचायतीने आपले अधिकार वापरुन कारवाई केली पाहिजे, असेही मार्टीन्स यांनी सांगितले.

Cutbona Fishing Jetty
Dona Paula Jetty: प्रश्‍न सोडवा अन्यथा धरणे आंदोलन करू; विक्रेत्यांचा इशारा

५० मजूर आजारी; सिल्वांकडून चिंता

आमदार क्रुझ सिल्वा म्हणाले, येथील वेगवेगळ्या आजारांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. यावेळी ही समस्या जास्तच गंभीर झाली आहे. मत्यव्यवसाय खाते याकडे गंभीरतेने पहात नाही. सोमवारी पाहणीत तेथील सर्व खाद्य स्टॉल्स व इतर साधनांची पाहणी केली जाईल. कमीत कमी चार हजार मजूर कामाला असतात. नेमक्या किती जणांना आजाराची लागण झाली आहे, हे माहीत नसले तरी आपल्या माहितीप्रमाणे कमीत कमी ५० तरी मजूर आजारी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com