Dona Paula Jetty: प्रश्‍न सोडवा अन्यथा धरणे आंदोलन करू; विक्रेत्यांचा इशारा

Vendors Rehabilitation: दोना पावला जेटीवरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन हवेतच विरले
Vendors Rehabilitation: दोना पावला जेटीवरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन हवेतच विरले
Dona Paula Jetty SellersDainik Gomantak

दोना पावला जेटीवरील विक्रेत्यांचे चांगल्या तऱ्हेने पुनर्वसन करण्याचे मंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन हवेतच विरले आहे. अजूनही येथील विक्रेत्यांना नवी दुकाने मिळालेली नाहीत.

त्याशिवाय जेटीची दररोज स्वच्छता होत नसल्याची तक्रार करीत येथील व्यावसायिकांचे प्रलंबित प्रश्‍न लवकरात लवकर न सोडवल्यास जेटीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा येथील व्यावसायिकांनी दिला आहे.

स्थानिक कार्यकर्ते फ्रान्सिस्को कुएल्हो आणि ‘आप’च्या नेत्या सिसील रॉड्रिग्स यांनी व्यावसायिकांबरोबर गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन येथील जेटीवर भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला.

आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे या येथील व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यात रस घेत नसल्यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे.

कुएल्हो म्हणाले, स्थानिक विक्रेत्यांसाठी नवीन दुकाने थाटण्यासाठी केवळ आश्‍वासने दिली जात आहेत. पूर्तता कधी होणार, असेही ते म्हणाले.

Vendors Rehabilitation: दोना पावला जेटीवरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन हवेतच विरले
Vasco Fish Seller: थेट वास्‍को पालिकेच्या दारातच मासेविक्री; किरकोळ मासळी विक्रेते आक्रमक

सिसील रॉड्रिग्स, ‘आप’ नेत्या

आमदार जेनिफर मोन्सेरात आणि विद्यमान सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. येथील विक्रेत्यांनाही अशीच आश्‍वासने दिली होती. यापूर्वी काँग्रेस पक्षाचे नेते येथे येऊन गेल्यानंतर पर्यटन मंत्री व महसूल मंत्री धावत येथे आले होते. या जेटीवर अनेक दशकांपासून स्थानिक व्यवसाय करतात, अनेकांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. येथील विक्रेत्यांना चांगल्या सुविधा देण्याचे केवळ आश्‍वासने दिली जातात, परंतु ती सत्यात येत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com