Goa Assembly: संरक्षक भिंतीसाठी पर्यावरण परवान्याची प्रतिक्षा; हळर्णकर यांची माहिती

Nilkanth Halarnkar About Cutbona Jetty: कुटबण येथील मच्छीमारी जेटीजवळ पाण्याचा प्रवाह मर्यादित करण्यासाठी संरक्षक भिंतीचा मुद्दा
Nilkanth Halarnkar About Cutbona Jetty: कुटबण येथील मच्छीमारी जेटीजवळ पाण्याचा प्रवाह मर्यादित करण्यासाठी संरक्षक भिंतीचा मुद्दा
Jetty Canva
Published on
Updated on

पणजी: कुटबण येथील मच्छीमारी जेटीजवळ पाण्याचा प्रवाह मर्यादित करण्यासाठी संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी पर्यावरण परवाना मिळाल्यानंतर लगेच हाती घेतले जाईल. कुटबण जेटीचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व मच्छीमारी जेटी स्थानिक मच्छीमारी संस्था तसेच विविध क्षेत्रांतील घटकांशी चर्चा करून विकसित केल्या जातील, अशी माहिती मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी दिली.

राज्यातील विविध जेटींच्या संदर्भातील प्रश्‍न आमदार क्रुझ सिल्वा यांनी विचारला होता. कुटबण जेटीजवळ पाण्याचा प्रवाह मर्यादित करण्यासाठी भिंत उभारण्याच्या कामाची निविदा २०१६ साली काढली होती. या कामासाठी पर्यावरण परवाना मिळालेला नाही. येथील काही स्थानिकांनी या बांधकामाला विरोध करून राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती.

लवादाने २०२१ रोजी निवाडा देताना हे बांधकाम करण्यापूर्वी पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) करून त्यासाठी पर्यावरण परवाना घेण्याचे निर्देश दिले होते. मूल्यांकनासाठी मद्रास आयआयटीला नेमले आहे. त्यांचा अहवाल मिळताच पर्यावरण परवाना घेऊन काम सुरू केले जाईल, असे मंत्री हळर्णकर म्हणाले.

मच्छीमारांचे एकच फेडरेशन हवे

या जेटीचे काम सुरू केले जाईल, तेव्हा तेथील मच्छीमार संस्थांनी एकजुट करून त्यांच्या समस्या मांडाव्यात. कारण काम हाती घेतल्यानंतर काही लोक विरोध करतात, तर काहीजण न्यायालयात जातात, तर काहीजण काम बंद पाडतात. मच्छीमारी संस्थांमध्ये मतभेद आहेत. त्यांना एकच फेडरेशन करण्यास आमदारांनी सांगावे, अशी सूचना मंत्री हळर्णकर यांनी केली.

Nilkanth Halarnkar About Cutbona Jetty: कुटबण येथील मच्छीमारी जेटीजवळ पाण्याचा प्रवाह मर्यादित करण्यासाठी संरक्षक भिंतीचा मुद्दा
Cutbona Betul Jetty: कुटबणची मच्छीमार जेटी पाच वर्षांनंतरही वापराच्या प्रतीक्षेत

जेटीकडील रस्ता रूंद करा!

या कामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, जीसीझेडएमए व पंचायतीचा दाखल घेतला होता. मात्र, सरकारने पर्यावरण परवाना घेतला नव्हता. त्यामुळे त्याला लोकांनी विरोध केला, त्यात काहीच गैर नव्हते. कुटबण जेटीकडे १५ मीटर रुंद रस्ता आहे. मात्र त्यावरून बर्फाची अवजड वाहने नेण्यास बंदी आहे. हे बांधकाम अवजड वाहनांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे जर वाहन नेता येत नसेल तर या जेटीचा उपयोगच काय, असा प्रश्‍न आमदार सिल्वा यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com