कर्नाटकातून येणारे मासे विक्रेते आणि नागरीक चोर वाटेने गोव्यात

कारवार मधील मासे विक्रेते व नागरीक पोळे तपासणी नाक्याला बगल देऊन आड वाटेने गोव्यात प्रवेश करीत आहेत.
पोळे तपासणी नाक्यावरील कोरोना तपासणीला बगल देऊन मासे विक्रेत्या व कारवार मधील नागरीक गोव्यात.
पोळे तपासणी नाक्यावरील कोरोना तपासणीला बगल देऊन मासे विक्रेत्या व कारवार मधील नागरीक गोव्यात.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण - कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या नागरीकांना कोरोना निगेटिव्ह (Corona Negative) दाखला सक्तीचा आहे. अन्यथा तपासणी नाक्यावर चोवीस तास रॅपीड अॅन्टिजन (Rapid Antigen) तपासणी सेवा शुल्क सुरू करण्यात आली आहे. मात्र कारवार मधील मासे विक्रेते (Fish Sellers) व नागरीक पोळे तपासणी नाक्याला बगल देऊन आड वाटेने गोव्यात प्रवेश करीत आहेत.

पोळे तपासणी नाक्यावरील कोरोना तपासणीला बगल देऊन मासे विक्रेत्या व कारवार मधील नागरीक गोव्यात.
Goa: ‘लोकमान्य’च्‍या मडगाव शाखेचे आज स्थलांतर

दिवसाकाठी सुमारे पंचवीस मासे विक्रेत्या महिला तपासणीचा ससेमीरा चुकवत पोळे येथे प्रवेश करून कदंबा महामंडळाच्या बस गाड्यानी काणकोणच्या वेगवेगळ्या भागात मासे विक्रीसाठी जातात. याचाच फायदा अन्य नागरीकही घेत आहेत. त्यामुळे करोना महामारी काणकोण तसेच अन्य भागात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पोळे तपासणी नाक्यावरील कोरोना तपासणीला बगल देऊन मासे विक्रेत्या व कारवार मधील नागरीक गोव्यात.
Goa Curfew: राज्याच्या सीमा सील, मात्र चोरवाटा सुरुच; पोलीस सुस्त

कर्नाटकातील काही भागात डेल्टा प्लस रुग्ण सापडले आहेत. त्यासाठी या आडवाटा प्रशासनाने सील करण्याची गरज आहे. मासे विक्री करून झाल्यानंतर या मासे विक्रेत्या महिला बसगाड्यांनी पोळे पर्यत येऊन आडवाटेने पोलिसांच्या डोळ्यांदेखत निघून जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com